rupali chakankar, soham chakankar, virjan movie SAKAL
मनोरंजन

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर एकदम खुश.. मुलाच्या पहिल्या सिनेमातलं रोमँटिक गाणं केलं शेअर

रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर विरजण या आगामी मराठी सिनेमात झळकणार आहे

Devendra Jadhav

Rupali Chakankar Son Soham Chakankar News: राजकीय नेत्यांची मुलं अभिनय क्षेत्रात येणं ही गोष्ट काही नवीन नाही. आपल्यासमोर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा मुलगा रितेश देशमुखचं चांगलं उदाहरण डोळ्यासमोर आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला अयोग्य अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर मनोरंजन विश्वात प्रवेश करतोय. रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर विरजण या आगामी मराठी सिनेमात झळकणार आहे.

(ncp politician Rupali Chakankar son soham entry into cinema will be seen in this Marathi movie )

रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मुलाच्या नवीन गाण्याचा प्रोमो शेअर करत भावना व्यक्त केल्यात. रुपाली लिहीतात.. आज सोहमच्या 'विरजण' या चित्रपटातील 'देवा सांग ना'' हे गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे गायक आदर्श शिंदे यांनी गायले आहे. अशी पोस्ट करत त्यांनी भावना व्यक्त केल्यात.

याआधी विरजण सिनेमाचे पोस्टर आणि 'माझी आई तू' हे गाणे प्रदर्शित झाले होते. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता 'विरजण'च्या ट्रेलरची वाट रुपाली आणि सोहमचे फॉलोअर्स आहे. विरजण सिनेमात सोहमसोबत अभिनेत्री शिल्पा ठाकरे मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT