NDA Vice Presidential Candidate News esakal
मनोरंजन

उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखडांशी सलमानचं खास नातं?

राष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर आता उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारीची चर्चा आहे.

युगंधर ताजणे

Vice President Election: राष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर आता उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारीची चर्चा आहे. काही पक्षांकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहे. एनडीएच्या वतीनं राजस्थानमधील जगदीप धनखड यांचे (NDA Vice Presidential Candidate Jagdeep Dhankar) नाव पुढे आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन धनखड यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मोदींनी लिहिलं आहे की, एका शेतकऱ्याचा मुलगा आता देशाचा उपराष्ट्रपती (Viral News) होणार आहे. धनखड हे त्यांच्या विनम्रतेसाठी ओळखले जाणारे व्यक्ती आहेत. त्यांची कायदे क्षेत्रातील प्रवासही उल्लेखनीय असाच आहे. राज्यपाल म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे.

दुसरीकडे सोशल मीडियावर धनखड आणि बॉलीवूडमधील भाईजान सलमान (Bollywood Actor Salman Khan) खान यांच्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. धनखड आणि सलमान खान यांच्यातील खास नातं आहे तरी काय, हे आपण जाणून घेणार आहोत. 1998 मध्ये सलमान खानवर काळवीटची शिकार केल्याचा आरोप होता. त्याप्रकरणी त्याच्यावर राजस्थानातील कोर्टामध्ये खटला सुरु होता. त्यावेळी त्याचे वकील म्हणून धनखड यांनी भूमिका निभावली होती. सलमानचे वकील देवानंद गहलोत यांच्यामार्फत जगदीप धनखड यांची निवड करण्यात आली होती. सलमानला जामीन मिळवून देण्यात धनखड यशस्वी झाले होते. त्यावेळी सलमानच्या काळवीट प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चाही होती.

1998 मध्ये सुरज बडजात्या यांनी जोधपूर शहाराच्या आसपास असणाऱ्या काही खेडेगावात हम साथ साथ है नावाच्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु केले होते. त्यात सलमान खान, तब्बु, सैफ अली खान, नीलम, सोनाली बेंद्रे हे कलाकार होते. यासगळ्यांवर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप होता. त्यांना न्यायालयात हजरही करण्यात आले होते. सलमानवर काळवीट आणि तीन हऱणांची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. अजुनही ते केस जोधपूर उच्च न्यायालयात सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT