neena 
मनोरंजन

गर्भवती नीना यांना समलैंगिकाशी लग्न करण्याचा दिला होता सल्ला

आत्मचरित्रात नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा

स्वाती वेमूल

अभिनेत्री नीना गुप्ता Neena Gupta यांचं 'सच कहूँ तो' हे आत्मचरित्र सध्या जोरदार चर्चेत आहे. कारण या आत्मचरित्रात नीना यांनी त्यांच्या करिअर आणि खासगी आयुष्याविषयी बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. लग्न न करता गरोदर राहिल्यामुळे नीना यांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सच्या Vivian Richards प्रेमात त्या पडल्या होत्या. मात्र नीना गर्भवती राहिल्यानंतर विवियनने त्याची पत्नी आणि कुटुंबाला सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. नीना यांनी मुलगी मसाबाला Masaba Gupta जन्म दिला आणि तिचं संगोपन एकटीनेच केलं. मात्र गर्भवती असताना नीना यांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं, त्याबद्दल त्यांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे. नीना या गरोदर असताना त्यांच्या एका मित्राने मुंबईतील समलैंगिक व्यक्तीशी लग्न करण्याचा सल्ला त्यांना दिला होता. (Neena gupta friend tried to get her married to a gay man when she was pregnant)

सामाजिक आयुष्यातील ताणातून मुक्त होण्यासाठी संबंधित समलैंगिक व्यक्तीला लग्न करायचं होतं, असं सुजॉय मित्राने नीना यांना सांगितलं. लग्नानंतर त्या व्यक्तीने नीना यांच्या मुलीचा स्वीकार केला असता, मात्र नीना आणि त्यांच्या कुटुंबापासून ती व्यक्ती लांबच राहणार होती.

'मी त्यांच्यासमोर जोरात हसले. कारण फक्त वादविवाद टाळण्यासाठी लग्न करावं, हे मला पटत नव्हतं. मला अत्यंत कठीण प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत, हे मला ठाऊक होतं. त्यातही अभिनेत्री असल्याने माझ्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या गोष्टींना मी सामोरं जाईन, असं मनाशी पक्कं केलं होतं. तोपर्यंत सैल कपडे वापरून गरोदर असल्याची बातमी मी लपवणार होते', असं नीना 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.

अभिनेते सतीश कौशिक यांनीसुद्धा नीना यांना लग्नाची मागणी घातली होती, असा खुलासा या आत्मचरित्रात करण्यात आला आहे. नीना गर्भवती असताना सतीश कौशिक यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली होती, असं त्यात लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

Silver Import: सोनेनंतर आता चांदीवरही केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवे नियम लागू केले; आता अतिरिक्त मंजुरी लागणार

SCROLL FOR NEXT