neena 
मनोरंजन

'ऐनवेळी त्याने फोन करून लग्नास नकार दिला'

नीना गुप्ता यांनी सांगितली ती कटू आठवण

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (neena gupta) यांच्या जीवनावर आधारित 'सच कहूँ तो'(Sach Kahun Toh) हे पुस्तक 14 जून रोजी प्रकाशित झाले. या पुस्तकामध्ये नीना यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांबद्दल लिहिले आहे. अभिनेत्री करिना कपूरसोबतच्या एका मुलाखतीमध्ये नीना यांनी 'सच कहूँ तो' हे पुस्तक लिहित असतानाचा प्रवास सांगितला. तसेच नीना यांनी त्यांच्या लग्नाबद्दल देखील सांगितले. या मुलाखतीचा व्हिडीओ नीना यांनी सोशल मीडियावर शेअर केला.(neena gupta reveals ex cancelled their wedding at last minute)

नीना यांनी मुलाखतीमध्ये सांगितले, 'माझ्या आयुष्यात एक मुलगा होता ज्याच्यासोबत मला लग्न करायचे होते. मी लग्नासाठी खरेदी करत होती. पण ऐनवेळी त्याने मला फोन केला आणि सांगितले की मी तुझ्यासोबत लग्न करू इच्छित नाही. मला समजले नाही की त्याने लग्नाला नकार का दिला? मला आजपर्यंत समजलेलं नाही की, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं. पण मी काहीच करु शकत नाही. मी माझ्या आयुष्यात पुढे निघून आले. पण त्या व्यक्तीशी लग्न झालं असतं तर मला आनंद झाला असता. त्याच्या आई-वडिलांबद्दल खूप आदर आहे. मी त्यांच्या घरी राहत होते. तो आता त्याच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे. त्याची मुलं आहेत.'

पुढे त्या म्हणाल्या, 'लोक म्हणतात की मी माझे जीवन माझ्या अटीशर्तींवर जगले. वास्तविक मी असे कधीच केले नाही. मी जिथे जिथे चुकले तिथे मी ती चूक स्वीकारत गेले. मला एक पती, मुले असे सामान्य आयुष्य हवे होते. जेव्हा मी इतर लोकांना पाहते तेव्हा मला थोडासा हेवा वाटतो. मला जे पाहिजे होते ते मला मिळाले नाही म्हणून मी कधी कोणाला दोष दिला नाही.'

नीना यांनी विवेक मेहरा यांच्यासोबत लग्न केले. नीना गुप्ता यांनी 'मंडी','उत्सव','त्रिकाल','बधाई हो', 'सरदार का ग्रॅण्डसन' आणि 'संदीप और पिंकी फरार' या चित्रपटात काम केले आहे. लवकरच नीना आणि त्यांची मुलगी मसाबा गुप्ता यांच्या 'मसाबा मसाबा' या वेब सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT