Neena Gupta(Bollywood Actress) Google
मनोरंजन

'स्त्रीनं सेक्सी कपडे घातले म्हणजे ती...'; नीना गुप्ता काय म्हणाल्यात?

नीना गुप्ता यांना त्यांनी घातलेल्या एका सेक्सी ड्रेसवरनं ट्रोल करण्यात आलं होतं.अभिनेत्रीचा कडक शब्दातला व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

नीना गु्प्ता(Neena Gupta) यांचा एक व्हिडीओ(Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर जोरदार व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओत त्या ट्रोलर्सचा खरपूस समाचार घेताना दिसत आहेत. नीना गुप्ता यांना त्यांनी घातलेल्या एका ड्रेसवरनं ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावर नीना गुप्ता यांनी ट्रोलर्सना 'स्त्रीयांना त्यांच्या ड्रेस वरनं पारखू नका,नावं ठेवू नका' अशा शब्दात डटावलंय. व्हिडीओत आपण पाहू शकतोय वयाची साठी पार केलेल्या नीना गुप्ता यांनी एक वेस्टर्न आऊटफिट्स परिधान केला आहे,जो त्यांच्यावर खूप खुलून दिसतोय खरं तर,त्या ड्रेसला सूट होईल असा एक नेकलाइन पीस त्यांनी गळ्यात परिधान केलाय.

त्या म्हणतायत,''मला हा व्हिडीओ यासाठी पोस्ट करायचा आहे कारण मला वाटतं ज्या स्त्रिया असे सेक्सी कपडे घालतात,जसा ड्रेस मी आता याक्षणी घातलाय त्यांना काही कामधंदे नसतात,बेकार असतात त्या. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी संस्कृत विषयात Mphil डिग्री घेतली आहे. आणखी बरंच शिक्षण मी घेतलं आहे. तेव्हा कोणाच्या कपड्यावरनं त्याची लायकी ठरवू नका. ट्रोल करणाऱ्यांनो हे लक्षात घ्या''.

नीना गुप्ता यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी त्यांच्या विचारांचं समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. कोणी म्हटलंय,'तुम्ही खूप कमाल आहात'. तर एकीनं लिहिलंय,'मला नेहमी साडी नेसून,त्यावर छानसा बन बांधून कपाळावर मोठी टिकली लावून शृंगार करायला आवडतो. मी वयाच्या २२ व्या वर्षापासनं तशीच राहत आलेय. मला सगळे 'बेहनजी' म्हणून हाक मारतात माझ्या ऑफिसमध्ये. पण मी ते सगळं हसण्यावारी नेते. ठीक आहे,संकुचित विचारांची लोकं आणखी काय बोलणार. मी या सगळ्या बोलणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. मला जसं वाटतं तसं राहते'. आणखी एका नेटकऱ्यानं व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवली आहे,'एवढ्या प्रेमानं कधी ट्रोलरला ओरडलं नसेल. नीनाजी तुम्ही खूप चांगल्या आहातट. नीना गुप्ता यांच्या या पोस्टला कियारा अडवाणी,ताहिरा कश्यप,अर्चना पुराण सिंग,सुनिल ग्रोव्हर आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी समर्थन दिलं आहे. नीना गुप्ता नेमकं स्त्रीयांविषयी आणि त्यांना ट्रोल करणाऱ्यांना नेमके काय म्हणाल्या आहेत तो व्हिडीओ बातमीत जोडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT