मनोरंजन

'तुला पाहून कोणी काम देणार नाही'

'तू कधीच हेमा मालिनी किंवा आलिया भट्ट होऊ शकणार नाही'

शर्वरी जोशी

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री नीना गुप्ता neena gupta यांचं काही दिवसांपूर्वीच 'सच कहूँ तो' हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. या आत्मचरित्रामध्ये नीना यांनी त्यांच्या खासगी आयुष्य व कलाविश्वातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. केवळ प्रकाशच नव्हे तर त्यांनी अनेक धक्कादायक खुलासेदेखील केले आहेत. त्यामुळे गेल्या काही काळापासून त्या सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. यामध्येच त्या त्यांच्या मुलीच्या म्हणजेच मसाबाच्या करिअरविषयीदेखील व्यक्त झाल्या आहेत. मसाबाने अभिनेत्री होऊ नये असं त्यांना कायम वाटत होतं. विशेष म्हणजे मसाबाचा लूक पाहून तिला कोणी काम देईल असं त्यांना वाटत नव्हतं. एका मुलाखतीत बोलत असताना त्यांनी मनातील ही गोष्ट जाहीररित्या व्यक्त केली होती. (neena-gupta-told-masaba-gupta-why-she-cant-become-actor-says-jis-tarah-tumhari-shakal-hai)

मसाबा ही नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांची मुलगी असून सध्या ती सेलिब्रिटी फॅशन डिझायनर म्हणून काम करत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच' मसाबा मसाबा' या सीरिजच्या माध्यमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. नीना गुप्ता यांना मसाबाने बॉलिवूडमध्ये काम करु नये असं वाटत असतानाच दुसरीकडे मात्र, मसाबाच्या पहिल्याच सीरिजचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं.

"मी मसाबाला आधीच सांगितलं होतं जर तुला अभिनेत्री व्हायचं असेल तर तू विदेशात जा. ज्या पद्धतीची तुझी शरीररचना किंवा चेहरा आहे. किंवा, एकंदरीत तू ज्या पद्धतीने दिसतेस ते पाहता तुला या देशात काम करण्याची संधी फार कमी आहेत. त्यामुळे येथे तू कधीच अभिनेत्री होऊ शकत नाही. तू कधीच हेमा मालिनी किंवा आलिया भट्ट नाही होऊ शकत", असा सल्ला नीना गुप्ता यांनी मसाबाला दिला होता.

पुढे त्या म्हणतात, "लोक किती मतलबी असतात ना. एकदा मला, करण आणि शाहरुख खान फ्लाईटमध्ये भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी मला त्यांचा फोन नंबर दिला. पण, ज्यावेळी मी त्यांना फोन केला तर त्यांनी उचललादेखील नाही."

दरम्यान, मसाबाचा जन्म झाल्यानंतर विवियन रिचर्ड्स यांनी नीना गुप्तांसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर नीना गुप्ता यांच्या आयुष्यात अनेक संकट आणि चढउतार आले. मात्र, या सगळ्या परिस्थितीला त्या धीराने सामोऱ्या गेल्या. या सगळ्याचं वर्णन त्यांनी त्यांच्या सच कहूँ तो या आत्मचरित्रात केलं आहे. नीना गुप्ता यांनी २००८ मध्ये दिल्लीतील चार्टर्ड अकाऊंट विवेक मेहरा यांच्यासोबत लग्न केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: हडपसरमधील मगरपट्टा परिसरात घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू; चेअरमनसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा, नेमकं काय घडलं!

पुस्तकावरून वाद पेटला; शिंदे गटाच्या आमदाराचा संताप अनावर; प्रकाशकाला फोनवर अश्लील धमक्या, ऑडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईचं तापमान वाढणार, काही जिल्ह्यांमध्ये होणार पावसाची बरसात

Free Education for Girls Maharashtra : मुलींना उच्चशिक्षण मोफत, पण विकास शुल्कचे बंधन; महाविद्यालय आकारतात 15 ते 25 हजार रुपये

Satara Mining: अवैध उत्खनन, गौण खनिज तस्करीला चाप; सातारा जिल्ह्यात १७६ जणांवर कारवाई, खनिकर्म विभागाने केला २१.८४ कोटींचा दंड!

SCROLL FOR NEXT