Mogra-Phulaala--Poster 
मनोरंजन

'मोगरा फुलला'मध्ये नीना कुलकर्णी साकारणार खंबीर आई

सकाळवृत्तसेवा

‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’मध्ये हिंदी व मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी या स्वप्नील जोशीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोगरा फुलला’ 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नील जोशीच्या खंबीर आईची भूमिका नीना कुळकर्णी साकारत आहेत.

नुकतेच चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले, पोस्टर मध्ये स्वप्नील जोशी आपल्या आईच्या म्हणजेच नीना कुलकर्णी बरोबरचा लुक, आणि आपुलकीच्या नात्यात गुंतलेली ओढ’ अशी सुंदर वाक्य लिहिले आहे जे आई आणि मुलामधील मायेचे जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करत आहे.

नीना कुलकर्णी सांगतात, “मी सेटवर काम करत असताना खुश होते कारण या चित्रपटाची दिग्दर्शिका श्रावणी माझी जुनी मैत्रीण आहे. स्वप्नील जोशीबरोबर पुन्हा 14 वर्षांनी काम करायला मिळालं, चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे ह्यांच्या बरोबर पुन्हा काम करायला मजा आली. 'मोगरा फुलाला' ही एक सुंदर, संवेदनशील कथा आहे. या कथेमधील माझं पात्र साकारताना मला खूप समाधान मिळालं. या चित्रपटाचे निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांचादेखील विशेष उल्लेख करेन. त्यांचे विशेष आभार."

या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी याच्याबरोबर साई देवधर, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT