Neetu Kapoor  instagram
मनोरंजन

'..म्हणून मी मुलांसोबत राहत नाही'; नीतू कपूर यांनी सांगितलं कारण

रणबीर कपूर, रिधिमा सहानी यांच्यासोबत राहत नाहीत नीतू कपूर

स्वाती वेमूल

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर Rishi Kapoor यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीतू कपूर Neetu Kapoor यांनी मुलांसोबत न राहण्यामागचं कारण सांगितलं. नीतू यांना रणबीर कपूर Ranbir Kapoor हा मुलगा आणि रिधिमा कपूर सहानी Ridhima Kapoor Sahani ही मुलगी आहे. पण त्या या दोन मुलांसोबत राहत नाहीत. एकटं राहण्याचा निर्णय का घेतला, याबाबत त्यांनी उलगडून सांगितलं. (Neetu Kapoor opens up about not living with Ranbir Kapoor and Riddhima Kapoor Sahni)

'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत नीतू कपूर म्हणाल्या, 'त्यांनी त्यांच्या आयुष्यात व्यग्र राहावं असं मला वाटतं. मी म्हणेन, माझ्या हृदयात राहा पण माझ्या डोक्यावर चढू नका. जेव्हा लॉकडाउनमध्ये रिधिमा माझ्यासोबत असायची, तेव्हा मला सतत तिची काळजी वाटायची. तिचा पती भारत एकटाच दिल्लीत होता आणि त्याला सर्वकाही पाहायचं होतं. मी अक्षरश: तिला घरातून जायला सांगत होती. मला माझी प्रायव्हसी आवडते. मला असं जगायची सवय झाली आहे. मला माझ्या मुलांपासून लांब राहायची सवय झाली आहे.'

हेही वाचा : कधी, कुठे आणि कसं पाहू शकता सलमानचा 'राधे' चित्रपट?

रिधिमा आणि रणबीर यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे ऋषी आणि नीतू कपूर यांना सुरुवातीपासूनच मुलांपासून लांब राहायची सवय होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. 'त्यांना त्यांचं आयुष्यसुद्धा जगायचं आहे. जेव्हा ते मला भेटतात, तेव्हा मी खूश होते. पण त्यांनी पुन्हा आपापल्या घरी जाऊन त्यांचं आयुष्य जसं आहे तसं जगत राहावं, असं मला वाटतं. याबाबतीत मी फार स्वतंत्र आहे. मला माझं आयुष्य जसं आहे तसंच आवडतं', असं त्या पुढे म्हणाल्या.

नीतू कपूर या 'जुग जुग जियो' या चित्रपटातून पुनरागमन करणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत अनिल कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिका साकारणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT