neetu kapoor 
मनोरंजन

नीतू कपूर यांनी हॉटेलमध्ये फोडल्या प्लेट्स; व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

स्वाती वेमूल

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या पत्नी व अभिनेत्री नीतू कपूर Neetu Kapoor यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसोबत त्या एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. त्याच हॉटेलमधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये नीतू कपूर प्लेट्स फोडताना दिसत असून त्यांच्यासोबत मुलगी रिधिमा कपूर आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा आहेत. रिधिमाच्या एका फॅनपेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हॉटेलमध्ये का फोडल्या प्लेट्स?

नीतू कपूर आणि हॉटेलमधील त्या व्यक्तीने अशा पद्धतीने प्लेट्स का फोडल्या, असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर त्यांनी रागाच्या भरात नाही तर ग्रीक प्रथेचा भाग म्हणून फोडल्या आहेत. संबंधित हॉटेलमध्ये ती प्रथा पाळण्यात येते. यामुळे वाईट गोष्टींपासून दूर राहण्यास मदत होते असा समज आहे.

नीतू कपूर या लवकरच 'जुग जुग जिओ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत अनिल कपूर, कियारा अडवाणी आणि वरुण धवन यांच्या मुख्य भूमिका आहेत. गेल्या वर्षी या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली होती. राज मेहता दिग्दर्शित हा एक फॅमिली ड्रामा आहे. 'जुग जुग जिओ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नीतू कपूर यांना कोविडची लागण झाली होती. काही दिवस क्वारंटाइनमध्ये राहून त्यांनी कोरोनावर मात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT