Raj Kapoor famously threw the wildest Holi parties. Esakal
मनोरंजन

Video: राज कपूर यांच्या 'Wild Holi' पार्टीची बातच काही और.. जाणून घ्या काय काय व्हायचं पार्टीत?

राज कपूर यांच्या या वाईल्ड पार्टीत अख्खं बॉलीवूड सामिल व्हायचं. याचा एक व्हिडीओ धुळवडीच्या निमित्तानं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Video: बॉलीवूडचे शोमॅन राज कपूर(Raj Kapoor) यांनी सिनेइंडस्ट्रीला सिनेमांचा चांगला काळ दाखवलाय. त्यांचे अनेक सिनेमे आजची पिढीसुद्धा एन्जॉय करते. 'श्री ४२०','आवारा','मेरा नाम जोकर' अशा सिनेमांची नावं झरझर तुमच्या डोळ्यासमोरून गेली देखील असतील.

पण सिनेमांसोबतच बॉलीवूडलाच नाही तर सर्वसामान्यांनाही क्रेझ असायची राज कपूरच्या जंगी होळी सेलिब्रेशनची. म्हटलं जातं,तिथं होळीला 'जंगली होळी'(Wild Holi) संबोधायचे. तिथं पांढऱ्या शुभ्र स्वच्छ कपड्यात येणारा प्रत्येकजण रंगांमध्ये माखून निघाला नाही तर नवल.

बरं यावरच तिथं समाधान मानलं जायचं नाही तर येणाऱ्या प्रत्येकाला मोठमोठ्या पाण्यानं भरलेल्या ट्युबच्या टबात बिनधास्त फेकलं जायचं. (Raj Kapoor WIld Holi Party)

जीव मुठीत घेऊन तिथं होळी सेलिब्रेशनला येणारा प्रत्येकजण कधी तिथल्या जंगली वातावरणात हरवून जायचा हे त्याला देखील कळायचं नाही. कपूर फॅमिलीच्या या धुळवड पार्टीची वाट प्रत्येकजण पहायचा.

गाणी,डान्स आणि धम्माल असा हा रंग आज प्रत्येकजण मिस करतोय. म्हणूनच तर राज कपूर यांच्या त्या होळीची आठवण करुन देत गेल्याच वर्षी त्यांची सून अभिनेत्री नीतू कपूरनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते.सोबत एक व्हिडीओ देखील त्यांनी पोस्ट केला होता.

यावर्षी धुळवडीच्या निमित्तानं ही खास आठवण आम्ही पुन्हा शेअर करत आहोत.

हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

नीतू कपूर(Neetu kapoor) यांनी व्हिडीओ पोस्ट करत लिहिलेलं,''जेव्हा एकमेकांसाठी प्रेम-आदर असतो तेव्हा एक कुटुंब पूर्ण होतं. हॅप्पी होळी!''

नीतू कपूर यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओची सुरुवातच एका माणसाला पाण्याच्या टबमध्ये बुडवण्यापासनं होते अन् कॅमेरा लगेच राज कपूर यांच्या चेहऱ्यावर जातो. राजकपूर आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसत आहेत.

त्या व्हिडीओत त्यांची पत्नी कृष्णा कपूर,शम्मी कपूर,त्यांच्या पत्नी नीला देवी असे सगळे दिसत आहेत. नीतू कपूर देखील पांढरा कुर्ता घातलेल्या दिसत आहेत. त्यांच्यासोबत लहानगा रणबीर कपूरही दिसत आहे.

Rishi Kapoor देखील कोणासोबत तरी डान्स एन्जॉय करताना दिसत आहेत. तर राज कपूर-शम्मी कपूर दोघे भाऊ हास्यकल्लोळात गुंतून गेलेले दिसत आहेत.

तर एका क्षणी त्या व्हिडीओत राज कपूरही डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओत राज कपूर यांनी होळीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचं असलेलं महत्त्व देखील सांगितलं आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. कुणी म्हटलेलं, 'खुप सुंदर आठवणी तर कुणी कपूरांच्या घरच्या गणेशोत्सव सेलिब्रेशनचीही आठवण काढली होती'.

करिश्मा कपूरनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळीच्या आठवणी शेअर केल्या होत्या. ज्यामध्ये तिनं बबिता आणि रणधीर कपूर या आपल्या आईवडिलांसोबतच्या होळीच्या आठवणी शेअर केलेल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal No 1 : नव्या वर्षात डिजिटल पत्रकारितेचा नेतृत्वाचा मुकुट पुन्हा ई-सकाळकडे, कॉमस्कोअरमध्ये पटकावले अव्वल स्थान

Retirement Plan : आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता नाही! या 5 योजनांत गुंतवणूक करा; तिजोरी भरलेलीच राहील, दरमहा मिळेल मोठी पेन्शन

Tilak Varma Injury: तिलक वर्माला पोटातील तीव्र वेदनेमुळे अचानक करावी लागली सर्जरी! त्याला झालेला अजार नेमका आहे तरी काय?

Mangal Gochar 2026: 18 वर्षांनंतर कुंभ राशीत मंगल गोचर! अग्नि-वायु एकत्र येऊन तयार होतोय अंगारक योग, वृषभसह 'या' 5 राशींच आयुष्य होईल अगदी कठीण!

Latest Maharashtra News Updates Live: आष्टापुरात बिबट्याने तीन बकऱ्यांचा घेतला जीव

SCROLL FOR NEXT