neha dhupia Sakal
मनोरंजन

Neha Dhupia: नेहा धुपियाच्या घरी तिसऱ्यांदा हलणार पाळणा? फोटो होतायेत व्हायरल

अभिनेत्री आजकाल चित्रपटांपासून दूर असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती मीडियाच्या चर्चेत असते.

Aishwarya Musale

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया नेहमीच चर्चेत असते. नेहाने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. अभिनेत्री आजकाल चित्रपटांपासून दूर असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती मीडियाच्या चर्चेत असते.

नेहा नुकतीच तिचा पती अंगदसोबत एका इव्हेंटमध्ये दिसली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी अंदाज लावला आहे की ही अभिनेत्री तिसऱ्यांदा आई होणार आहे.

होय, नेहा डीप नेक ग्रीन गाऊन परिधान करून कार्यक्रमात पोहोचली होती. तर तिचा पती अंगद बेदी काळा कुर्ता आणि धोती परिधान केलेला दिसत होता. दरम्यान, चाहत्यांनी व्हिडिओमध्ये तिचा बेबी बंप पाहिला, त्यानंतर तिच्या गरोदरपणाच्या अफवा पुन्हा एकदा उडू लागल्या आहेत.

नेहा पहिल्यांदा पती अंगद बेदीसोबत पंजाबी चित्रपट 'रंगीले'मध्ये दिसली होती. तो 2014 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर दोघेही 'उंगली' चित्रपटात एकत्र दिसले, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.

अभिनेत्री शेवटची 'अ थर्सडे' या चित्रपटात दिसली होती. तिचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्याशिवाय यामी गौतम आणि अभिनेता अतुल कुलकर्णी देखील दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT