neha 
मनोरंजन

नेहा गद्रे सेटवर झाली आऊट ऑफ कंट्रोल

सकाळवृत्तसेवा

सिनेमाच्या गोष्टी तर रंजक असतातच पण शुटींगच्यावेळी त्याहून रंजक गोष्टी तिथे घडत असतात. त्यातून क्वचितच गोष्टी आपल्या कानावर येतात. अशीच खबर सध्या जोरदार चर्चेत आहे, ती म्हणजे अभिनेत्री नेहा गद्रे 'गडबड झाली' सिनेमाच्या सेटवर आऊट ऑफ कंट्रोल झाली. अनेक लोकांकडून याची माहिती जमा करण्याचा प्रयत्न झाला पण, कुठूनच काही सुगावा हाती लागत नव्हता. मग अखेर सिनेमाचे दिग्दर्शक सन्तराम यांच्याशी संपर्क झाला तेव्हा कुठे या गोष्टीचा खुलासा झाला.

दिग्दर्शक पुढे सांगतात की, प्रांजली फिल्म प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. जितेंद्र राठोड निर्मित, रमेश रोशन सहनिर्माते असलेल्या आमच्या 'गडबड झाली' सिनेमातील एका गाण्याच्या चित्रिकरणासाठी आम्ही कुलू मनालीला गेलो होतो. राजेश शृंगारपुरे आणि नेहा गद्रे वर ते रोमँटिक गाणं चित्रित होणार होतं. आम्ही सर्व तिथे वेळेवर पोहोचलो. मायनस 7 डिग्री तापमान असल्याने आम्ही आधीच गारठलो होतो. अशात दोघांना चित्रित करायचे होते.

जरा वेळ चित्रीकरण ठीक होत होतं, परंतु संध्याकाळ होण्याच्या आतच नेहा थंडीने गारठून बर्फावर कोसळली. तिचे हात-पाय बधीर झाले होते. तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. ती अक्षरशः बेशुद्धच पडली. आम्ही इतके घाबरलो होतो कि, तिचे रक्त गोठले की काय असे वाटू लागले होते. सेटवर तात्काळ शेकोटी पेटवण्यात आली. गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पण त्याचाही काही उपयोग होईना. अखेर तिकडच्या डॉक्टरांना बोलावले. तिला हॉटेलवर घेऊन जाऊन उपचार केल्यानंतर कुठे मध्यरात्री तिला शुध्द आली आणि लगेच ती म्हणाली की तुम्ही इथे सर्व कसे..? काय झालं.. असं विचारू लागली कारण तिला काय घडलं हेच माहिती नव्हतं.

नेहा गद्रे सांगते की, हा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही. खरंच एवढी थंडी होती ना की, पुढे आम्हाला शुटींग करणेच शक्य नव्हते. अखेर आम्हाला लागलीच तिकडून निघावे लागले. मग आम्ही ते शुटींग वसई, पालघर येथे केले. माझ्या सोबत सिनेमात राजेश शृंगारपुरे, विकास पाटील, उषा नाडकर्णी, मोहन जोशी, संजय मोहिते, हर्षा गुप्ते, प्रमोद शिंदे, निरंजन नलावडे, हर्षी शर्मा, प्रतिभा यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाला रमेश रोशन यांचे संगीत लाभले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT