Neha Kakkar News esakal
मनोरंजन

Neha Kakkar 'रिअॅलिटी शो'मध्ये का रडते? ट्रोलिंगवर दिले स्पष्टीकरण

नेहाला 'बेबी क्राय' का म्हणतात?

सकाळ डिजिटल टीम

Neha Kakkar News : बॉलीवूडची गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. इंडस्ट्रीमध्ये जवळपास १५ वर्षांच्या कारकिर्दीत या गायिकेने अनेक सिंगिंग रिअॅलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे. नेहा कक्करने (Neha Kakkar) वयाच्या १६ व्या वर्षी पहिल्यांदा इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. पण काही कारणास्तव ती शो जिंकू शकली नाही.

गायिका अनेकदा रिअॅलिटी शोमध्ये भावूक होताना दिसते. त्यामुळे तिला 'क्राय बेबी' असेही म्हटले जाते आणि याच कारणामुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Entertainment News)

नेहा कक्करने ट्रोलिंगवर स्पष्टीकरण दिले

अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत नेहा कक्करला ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले, ज्यावर तिने उत्तर दिले की मी अशा लोकांना दोष देऊ शकत नाही. कारण असे बरेच लोक आहेत जे अजिबात भावनिक नसतात.

पण जे लोक माझ्यासारखे भावनिक आहेत, ते मला समजून घेतील आणि माझ्याशी रिलेट करतील. आज आपल्याला इतरांच्या वेदना जाणवणारे आणि त्यांना मदत करू इच्छिणारे फारसे लोक दिसत नाहीत. माझ्यात असे गुण आहेत आणि मला त्याची खंत नाही.

प्रत्येकजण संघर्ष करतो

नेहा पुढे म्हणाली की, जेव्हा आम्ही दाखवतो की एक स्पर्धक इतक्या गोष्टींचा त्याग करून इथपर्यंत कसा पोहोचू शकतो. त्यामुळे लोक स्वतःला त्याच्याशी जोडू शकतात.

कारण प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या वेळी ध्येय साध्य करण्यासाठी धडपड केलेली असते. आम्ही फक्त तेच शो दाखवतो, जे आमच्या घरात होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT