Neha Kakkar Google
मनोरंजन

नेहा कक्कर जमावाच्या तावडीत कशी फसली;पहा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी गायिका प्रेग्नंट असल्याच्या अफवेवरून चर्चेत होती

प्रणाली मोरे

'इंडियन आयडॉल १२' च्या सिझनमधून नेहानं(Neha Kakkar) अचानक एक्झिट घेतली होती. त्यानंतर ती प्रेग्नंट असल्यामुळे तिनं अचानक शो सोडला अशा चर्चांना ऊत आला. तिनं मात्र असं काही नसून आपण आराम करण्यासाठी,सततच्या शूटिंगमुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही तेव्हा 'फॅमिली टाईम-मी टाईम' एन्जॉय करण्यासाठी शो मधून बाहेर पडल्याचं सांगितलं होतं. नेहा गेली काही वर्ष इंडियन आयडॉल या शो चं परिक्षण करीत असल्यामुळे प्रत्येक घराघरात तिला ओळखलं जातं. तिने शो मधून परिक्षक म्हणून घेतलेली एक्झिट तिच्या चाहत्यांनाही आवडली नव्हती. त्यानंतर ती दिसली तेव्हा वजन वाढल्यामुळे तिला 'आई होणार आहेस का?' असे प्रश्न अनेकदा विचारले गेले. शेवटी तिनं आपल्या यू ट्युब चॅनेलवरील कार्यक्रमात या अफवांवर म्युझिकल स्टाईलमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. याला छान विनोदी तडकाही देण्यात आला होता.

नेहा अनेकदा आपला नवरा रोहनप्रीत सिंग सोबत मुंबईत लंच-डिनर डेटला जाताना दिसत असते. दरवेळेस मीडिया फोटोग्राफर्सनी फोटोसाठी थांबायला सांगितल्यावर ती फार आडेवेढे घेत नाही. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपले गाण्याचे किंवा नवऱ्यासोबतचे,भाऊ टोनी कक्कर सोबतचे व्हिडीओ,फोटो ती पोस्ट करीत असते. पण आता एका वेगळ्याच व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे. फिल्मी ग्यान या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. ज्यात ती गाडीत बसलेली दिसत आहे. पण पर्समधून १०० रुपयाच्या नोटा काढून ती गाडीभोवती जमलेल्या गरिबांना ते देत असताना दिसत आहे. पण त्यावेळेस असं काही होतं की बिचारी कावरीबावरी झालेली दिसून येत आहे. हा व्हिडीओ आम्ही बातमीत जोडलेला आहे,

पण तो जमाव इतका तिच्या अंगावर धावून गेला की गाडीच्या खिडकीतून हात टाकून तिच्या हातातून पैसे खेचण्याचा प्रकार पहायला मिळाला. बिचारी नेहा इतकी घाबरली होती पण तिनं तिथनं पळ नं काढता सर्वांना पैसे वाटप केल्यानंतरच निघायला प्राधान्य दिलं. नेहा कक्कर तिच्या अशा सोशल वर्कसाठीसु्द्धा ओळखली जाते. सध्याच्या आघाडीच्या गायिकांमध्ये तिचं नाव हटकून घेतलं जातं. पण तिचं वागणं पहाता ती आपली पाळंमुळं,संस्कार विसरली नाही याची प्रचिती अनेकदा येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT