Neha Marda welcomes baby girl post pregnancy complications, shares first pic of newborn sakal
मनोरंजन

Neha Marda Baby Girl: गोड बातमी! 'बालिका वधू' फेम अभिनेत्री नेहा मर्दाला मुलगी झाली हो..

काल अचानक नेहाच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नीलेश अडसूळ

Neha Marda welcomes Baby Girl: 'बालिका वधू' फेम अभिनेत्री नेहा मर्दा गेली काही दिवस प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. पण प्रेग्नेंसीदरम्यान अचानक तिची प्रकृती खालावल्याने काल तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला दोन दिवस डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवणार होते पण त्याआधीच तिची प्रसूती झाली आहे. नेहाने एका गोड मुलीला जन्म दिला आहे.

(Neha Marda welcomes baby girl post pregnancy complications, shares first pic of newborn)

 नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. नेहाची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी झाली आहे. नुकत्याच एका माध्यमाल नेहाने बाळाच्या आणि तिच्या हेल्थबाबत माहिती दिली. नह म्हणाली की, 'प्रेग्नेंसीदरम्यान मला माझ्या बीपीबद्दल काळजी वाटत होती. पाचव्या महिन्यात तर आणखी काळजी वाटू लागली. आमच्या डॉक्टरांनी आधीच सर्व तयारी केली होती.  प्रेग्नेंसीमध्ये अडचणी येऊ शकतात, याचा विचार आम्ही केला होता. सुदैवाने सर्व काही ठीक झाले.  मला एक सुंदर मुलगी झाली आहे. बाळ आणि मी आता बरे आहोत.'

पुढे नेहा म्हणाली की, 'मला या आठवड्याच्या अखेरीस कदाचित डिस्चार्ज मिळेल. माझी मुलगी फोर्टनाइटमध्ये आहे. मी तिला कुशीत घेण्याची वाट बघत आहे. प्री-मॅच्युअर डिलीव्हरीनंतर तिला एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे मी थोडावेळच तिला पाहू शकते.'

एवढंच नाही तर मुलीचं नाव काय ठेवायचं याचाही त्यांनी विचार केला आहे. त्याबद्दल नेहा म्हणाली, 'आम्ही बाळाच्या नावाचा विचार केला असून तीचं नाव 'A ' - 'अ' लेटर वरून ठेव विचार करत आहोत.'

नेहा मर्दा आणि आयुष्मान अग्रवाल हे 2012 साली विवाहबंधनात अडकले. पण तब्बल दहा वर्षे नेहाला मूलबाळ नव्हते. तिही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती. अखेर आज ती आई झाली आहे. या बातमीनंतर तिचे चाहते खुश झाले असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

नेहाने 2005 साली मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. नेहाने 'देवों के देव महादेव', 'डोली अरमानों की', 'पिया अलबेला', 'लाल इश्क' अशा छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले प्रमुख भूमिका केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT