Neha Pendse and Shardul Bayas get married 
मनोरंजन

PHOTOS : ग्लॅमरस नेहा पेंडसेने लग्नात घेतलेला भन्नाट उखाणा एकदा ऐकाच!

सकाळ डिजिटल टीम

मागील अनेक दिवस सुरू असलेल्या अभिनेत्री नेहा पेंडसेच्या लग्नाच्या चर्चा अखेरीस सत्यात उतरल्या. काल (ता. 5) नेहा तिचा बॉयफ्रेंड शार्दूल बायस याच्याशी विवाहबद्ध झाली. गेले काही दिवस नेहा शार्दूलसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत होती, त्यामुळे लवकरच ती लग्नबंधनात अडकेल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. अखेरीस 2 दिवस सुरू असलेला हा विवाहसोहळा आनंदात पार पडला व नेहा पेंडसेची आता नेहा बायस झाली आहे. 

नेहा-शार्दूलच्या लग्नात दोन्हीकडचे कुटूंबिय व जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित होते. नेहाने या लग्नासाठी खास मराठमोठा पेहराव केला होता. तिने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती, तर शार्दूलनेही पांढरा व गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. लग्नाच्या आधी संगीत व साखरपुड्याचा विधी पार पडला. या सर्व कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

या लग्नात लक्ष वेधून घेतलं ते नेहाने घेतलेल्या उखाण्याने. 'चांदीच्या ताटात फणसाचे गरे.. शार्दुलराव आहेत बरे… पण वागतील तेव्हा खरे' असा हटके उखाणा तिने लग्नात घेतला. अभिनेता अभिजीत खांडकेकरने हा उखाण्याचा व्हिडिओ शेअर केलाय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

SCROLL FOR NEXT