Neighbors Movie News Neighbors Movie News
मनोरंजन

Neighbors : शेजाऱ्यांची जगावेगळी प्रेम कथा ‘नेबर्स’ चित्रपट; २३ सप्टेंबरपासून सिनेमागृहात

एकाच मार्गाने प्रवास करणाऱ्या शेजाऱ्यांची जगावेगळी प्रेमकथा

सकाळ डिजिटल टीम

Neighbors Movie News कल्पना रोलिंग पिक्चर्स प्रौडक्शन निर्मित व ‘मिठुवाला प्रौडक्शन्स’चे सादरीकरण असलेल्या ‘नेबर्स’ हा चित्रपट २३ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एक रहस्यमय प्रेम कथा चित्रित करण्यात आली आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या चित्रपटात चेतन चिटणीस, कृतिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जवादे, शैलेश दातार, नेहा बाम, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद हृषीकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत तर छायालेखनाची महत्वाची जबाबदारी कॅमेरामन आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे.

गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद यांनी स्वरसाज चढविला आहे तसेच पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे. श्री गुरू पाटील आणि महेश किल्लेकर यांनी संकलन केले असून चित्रपटाची तांत्रिक बाजू विशाल तळकर (व्हीएफएक्स), भूषण दळवी (डीआय) आणि दिनेश उचिल व शंतनू अकेरकर (ध्वनी-रेखन), अनुप देव आदी तंत्रज्ञांनी सांभाळली आहे.

चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल भोसले असून कला दिग्दर्शन संजीव राणे यांनी केले आहे. शीतल पावसकर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT