Nepal resumes screening of Hindi movies except Adipurush SAKAL
मनोरंजन

Adipurush Nepal Update: दुष्काळात तेरावा महिना! नेपाळमध्ये आदिपुरुष वरील बंदी कायम, आता हिंदी सिनेमे...

'आदिपुरुष' चित्रपटाने सीते मातेचे 'भारत की बेटी' असे वर्णन केल्यानंतर वाद सुरू झाला

Devendra Jadhav

Adipurush Nepal Banned Update News: 'आदिपुरुष' चित्रपटातील "आक्षेपार्ह" शब्द आणि सीतेचे चित्रण पाहून संतप्त झालेल्या नेपाळने 19 जूनपासून सर्व हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती.

आता नेपाळने शुक्रवारी 'आदिपुरुष' वगळता सर्व हिंदी चित्रपट दाखवण्याची परवानगी दिली आहे. 'आदिपुरुष' चित्रपटाने सीते मातेचे 'भारत की बेटी' असे वर्णन केल्यानंतर वाद सुरू झाला.

अलीकडेच नेपाळने सर्व हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. पण आता मात्र आदिपुरुषला वगळता काठमांडूमधील अनेक सिनेमागृहांनी आता हिंदी चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा सुरू केले आहे.

आदिपुरुषचा हिंदी सिनेमांवर परिणाम :

सारा अली खान आणि विकी कौशल स्टारर 'जरा हटके जरा बचके' सिनेमाचे स्क्रिनिंग 'QFX' सिनेमात सुरू होते.

नेपाळ मोशन पिक्चर असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे की शुक्रवारपासून "आदिपुरुष" वगळता सर्व नेपाळी आणि परदेशी चित्रपट प्रदर्शित केले जातील.

आदिपुरुष बद्दल वाद:

ओम राऊत यांच्या आदिपुरुषचा एक संवाद, ज्यामध्ये सीतेचा उल्लेख “भारताची कन्या” म्हणून करण्यात आला आहे, त्यामुळे सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती, ज्याची घोषणा काठमांडूचे महापौर बलेंद्र शाह यांनी केली होती.

शाह यांनी गुरुवारी निर्णय आल्यावर सांगितले की ते कोणत्याही शिक्षेला सामोरे जाण्यास तयार आहेत परंतु हे प्रकरण “नेपाळच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याशी” संबंधित असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगी देणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT