Netflix March New Movie Latest News esakal
मनोरंजन

Netflix March Released 2024 : पुढील दोन आठवड्यांत 'नेटफ्लिक्स' वर मनोरंजनाचा तडका! जाणून घ्या कोणत्या 'सीरीज' येणार भेटीला?

येत्या काळात नेटफ्लिक्सवर नेटकऱ्यांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या मालिका अन् चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

युगंधर ताजणे

Netflix March Released 2024 : ओटीटीवर दिवसेंदिवस मनोरंजनाची मेजवानी रंगताना दिसत आहे. या सगळ्यात नेटफ्लिक्सनं बाजी मारली आहे. मार्च मध्ये नेटफ्लिक्सवर विविध विषयांवरील मालिका आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामुळे प्रेक्षकांना आणि नेटकऱ्यांना मोठी पर्वणी मिळणार असल्याचे मेकर्सचे म्हणणे आहे.

मार्च महिन्यात एकीकडे बॉलीवूडमधून वेगवेगळ्या सेलिब्रेटींचे चित्रपट समोर येत असताना दुसरीकडे ओटीटीवरही चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत. नेटफ्लिक्सनं आता १ ते १५ मार्च दरम्यान अपकमिंग फिल्म आणि सीरिज याविषयी नेटकऱ्यांना माहिती दिली असून चाहत्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा आहे. आपण त्या मालिका आणि चित्रपटांची माहिती घेणार आहोत.

नेटफ्लिक्सनं त्यांच्या ऑफिशियल इंस्टा हँडलवरुन याविषयी पोस्ट शेयर केली असून त्यामध्ये म्हटले आहे की, तुम्ही फक्त लिस्ट पाहा आणि तुमच्या आवडीच्या मालिका आणि चित्रपटांचा आनंद घ्या. न्यू ऑन नेटफ्लिक्स असे म्हणून त्यांनी ती यादी शेयर केली आहे. १ मार्च रोजी मामला लीगल है (Maamla Legal Hai) नावाची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. स्पेसमॅन(Spaceman), होम्स अँड वॉटसन (Holmes & Watson), स्पायडर मॅन फार फ्रॉम होम (Spider Man Far From Home), स्पायडर होम कमिंग (Spider Man Homecoming) आणि बर्डस ऑफ प्रे (Birds Of Prey) नावाच्या मालिका प्रदर्शित झाल्या आहेत.

७ मार्च रोजी काय आहे स्पेशल?

या दिवशी द जंटलमॅन तसेच ८ मार्च रोजी दमसेल आणि बॅक अप प्लॅन, १० मार्च रोजी ब्लॅक अॅडम, ११ मार्च रोजी यंग रॉयल्स सीझन ३ तसेच १३ मार्च रोजी द लॉर्ड ऑफ द रिंग्ज द रिटर्न ऑफ द रिंग आणि १५ मार्च रोजी मर्डर मुबारक नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या सगळ्यात मामला लीगल है नावाची मालिका ही नेटफ्लिक्सच्या टॉप १० वेब सीरिजमध्ये आली असून त्यामध्ये प्रसिध्द अभिनेता रवि किशन यांनी एका वकीलाची भूमिका पार पाडली आहे. दुसरीकडे १५ मार्च रोजी मर्डर मुबारक नावाचा जो चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्यामध्ये पंकज त्रिपाठी,विजय वर्मा आणि करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: डोंबिवलीत काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंकडून नाराजी उघड

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT