monoca oh my darling
monoca oh my darling  Team esakal
मनोरंजन

राधिका आपटेचा 'Monica, O My Darling' फर्स्ट लूक व्हायरल

युगंधर ताजणे

मुंबई - नेटफ्लिक्सनं (netflix) आता एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. त्या चित्रपटाचे नाव ओ माय डार्लिंग असे आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे आणि राजकुमार राव हे कलाकार दिसणार आहेत. या दोन्ही कलाकारांचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे. त्यापैकी राधिका आपटे ही सोशल मीडियावर जास्त काळ अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. त्यामुळे तिच्या नावाची चर्चा जास्तच होत असते. राजकुमार रावच्या लुडोमधील अभिनयानं प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फेडले होते. (netflix first look of radhika apte huma qureshi rajkummar rao from monica o my darling yst88)

नेटफ्लिक्सनं आता त्यांच्या मोनिका ओह माय डार्लिंग नावाच्या चित्रपटाचा (Monica, O My Darling) फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. पहिला लूक प्रदर्शित करताना निर्मात्यांनी लीड कास्टच्या नावांची घोषणाही केली आहे. त्यात राधिका आपटे (Radhika Apte), हुमा कुरेशी (huma qureshi), राजकुमार राव (rajkumar rao), सिकंदर खेर (sikandar kher) दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला करणार आहेत. यापूर्वी त्यांनी हर्षवर्धन कपूर आणि राधिका आपटेच्या स्पॉटलाईट नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

सोशल मीडियावर सध्या वासन बाला यांच्या या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या या प्रोजेक्टची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. अजून नेटफ्लिक्सनं या प्रोजेक्टबद्गल अधिक कुठलीही माहिती दिलेली नाही. राधिकानं या चित्रपटाच्या सेटवरील एक सीन शेयर केला आहे. त्याविषयी तिनं लिहिलं आहे की, सीन, सेट स्वॅग, मोनिका ओ माय डार्लिंगला आता सुरुवात झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT