NETFLIX DVD eSakal
मनोरंजन

NETFLIX DVD : एका पर्वाचा अंत! 'नेटफ्लिक्स'चा डीव्हीडी विभाग होणार बंद; शुक्रवारी पाठवणार शेवटचे 'रेड एन्व्हलप'

NETFLIX ही चित्रपट आणि वेब सीरीज निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी झाली आहे.

Sudesh

नेटफ्लिक्स हा ओटीटी प्लॅटफॉर्म आता सर्वांनाच माहिती आहे. केवळ ओटीटी प्लॅटफॉर्म न राहता, NETFLIX ही चित्रपट आणि वेब सीरीज निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी झाली आहे. मात्र, ही कंपनी सुरुवातीला काय करायची हे तुम्हाला माहिती आहे?

नेटफ्लिक्स कंपनी ही सुरुवातीला केवळ एक डीव्हीडी विक्री करणारी कंपनी होती. लोकांना DVD च्या माध्यमातून आवश्यक ते चित्रपट उपलब्ध करून देण्याचं काम ही कंपनी करायची. सोबतच, डीव्हीडी भाड्याने देण्याचं कामही नेटफ्लिक्स करत होती. यानंतर ओटीटी क्षेत्रात उडी घेत नेटफ्लिक्सने मनोरंजन क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकला.

ओटीटी आणि प्रॉडक्शन क्षेत्रातील जायंट कंपनी झाल्यानंतर देखील नेटफ्लिक्सचा डीव्हीडी डिस्ट्रिब्युशन विभाग कार्यरत होता. मात्र, आता हा विभाग बंद होणार आहे. येत्या शुक्रवारी नेटफ्लिक्स आपली शेवटची डीव्हीडीची ऑर्डर प्लेस करेल. त्यानंतर ही फॅक्टरी बंद करण्यात येणार आहे.

कसा कमी झाला डीव्हीडी बिझनेस

1998 साली नेटफ्लिक्सने पाठवलेली पहिली डीव्हीडी 'बीटलज्यूस' या सिनेमाची होती. एके काळी नेटफ्लिक्सच्या डीव्हीडी डिस्ट्रीब्युशन प्लांटमध्ये एका आठवड्यात 1.2 दशलक्ष डीव्हीडी प्रोसेस होत होत्या. या ठिकाणी त्या वेळी 50 लोक काम करत होते. या ठिकाणी आता केवळ सहा कर्मचारी शिल्लक आहेत.

पाठवणार शेवटचा रेड एन्व्हलप

नेटफ्लिक्सचा लाल रंगाचा लोगो तुम्हाला माहितीच असेल. हा लोगो लाल असण्याचं कारण देखील या डीव्हीडी विभागाशी संबंधित आहे. नेटफ्लिक्स आपल्या DVD या लाल रंगाच्या विशिष्ट लिफाफ्यात पाठवत होते. त्यामुळे लाल लिफाफा ही कंपनीची ओळख बनली होती. येत्या शुक्रवारी आता शेवटचे काही लाल लिफाफे पाठवण्यात येतील.

एका पर्वाचा अंत

नेटफ्लिक्स कंपनीने लोकांच्या टीव्ही पाहण्याचा सवयीवर मोठा प्रभाव पाडला. ज्या काळात लोकांना केवळ टीव्हीवर जे आहे तेच पाहता येत होतं, तेव्हा नेटफ्लिक्सने लोकांना त्यांच्या आवडीची गोष्ट पाहण्याचा पर्याय दिला. त्यामुळे नेटफ्लिक्सचं डीव्हीडी डिव्हिजन बंद होणं हा एका पर्वाचा अंत मानला जातो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT