zee marathi awards 
मनोरंजन

झी मराठी पुरस्कार सोहळ्यावर प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी

यंदाच्या सोहळ्यात आगळ्या-वेगळ्या पुरस्कारांची भर

स्वाती वेमूल

Zee Marathi Awards : टेलिव्हिजनवरील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित झी मराठी पुरस्कार सोहळा ३० नोव्हेंबर रोजी पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये 'तुझी माझी रेशीमगाठ', 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?' या दोन मालिकांचं वर्चस्व पहायला मिळालं. अल्पावधीतच या मालिकांनी लोकप्रियता कमावली. मात्र काही कारणांमुळे हा पुरस्कार सोहळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. या सोहळ्यातील काही बाबींवर प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

अभिनेत्री प्रार्थना बेहरेला या पुरस्कार सोहळ्यात तीन पुरस्कार मिळाले. तर संकर्षण कऱ्हाडेलाही तीन पुरस्कार मिळाले. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील इतरही कलाकारांनी पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. एकीकडे या मालिकेचं आणि त्यातील कलाकारांचं सोशल मीडियावर कौतुक होत असताना दुसरीकडे पुरस्कार सोहळ्यातील काही पुरस्कार विनाकारण देण्यात आल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. भावी सून म्हणून 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील स्वीटूला पुरस्कार मिळाला, तर भावी सासू म्हणून ओमकारच्या आईला म्हणजेच शकूला पुरस्कार मिळाला. स्वीटूने मोहीतशी लग्न केलं असताना ती भावी सून कशी असू शकते, असा प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे.

याउलट भावी सून म्हणून 'तुझ्या माझ्या संसाराला..' या मालिकेतील अदितीला आणि भावी सासू म्हणून सिद्धूच्या आईला पुरस्कार द्यायला हवा होता, असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं. भावी सासू म्हणून 'मन उडू उडू झालं' या मालिकेतील दीपूचादेखील विचार करायला हवा होता, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT