Dabur Advertisement  Google
मनोरंजन

वादाच्या भोवऱ्यात अडकली 'डाबर'ची नवीन जाहिरात

नेटकऱ्यांनी डाबरच्या जाहिरातीचा निषेध केला.

सकाळ डिजिटल टीम

दसरा, दिवाळी अशा सणांच्या काळामध्ये भरपूर जाहिराती पाहायला मिळतात. या दरम्यान, वेगवेगळ्या प्रॉडक्टसबद्दल लोकांना माहिती देणाऱ्या जाहिराती अनेक माध्यमांतून सादर केल्या जातात. तसंच अनेकदा एखादा संदेश देण्याच्या उद्देशाने देखील जाहिरात बनवली जाते. असाच एक वेगळा संदेश घेऊन डाबरने करवा चौथ (Karwa Chauth) चा निमित्त साधत एक जाहिरात सादर केली आहे. या जाहिरातीला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.ही जाहिरात एका फेस ब्लिचिंग प्रॉडक्टची आहे. यामध्ये दोन तरुण महिला त्यांच्या पहिल्या करवा चौथसाठी तयार होताना दिसत आहेत.

नक्की काय आहे जाहिरात ?

"फेमच्या या जाहिरातीमध्ये पहिल्या दोन महिला दिसतात. त्या चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी फेम लावत आहेत. या महिला करवा चौथच्या उपवासासंबंधी चर्चा करत आहे.नंतर या दोन्ही महिलांना घरातील एक जेष्ठ महिला सणासाठी नवीन कपडे देताना दिसत आहे पुढच्या सीनमध्ये दोन्ही महिला चंद्राकडे पाहत असल्याचे दाखवले आहे. मग त्या दोघी चंद्राला पाहून एकमेकांसोबत करवा चौथ साजरी करतात. जाहिरातीच्या शेवटी म्हटले आहे , जर एवढी चमक तुमची असेल, तर जगाची विचारसरणी का नाही बदलणार." डाबरच्या या जाहिरातीमधील हे शेवटचं वाक्य समलैंगिक जोडप्यांना प्रमोट करण्यासाठी केलं आहे.

सोशल मीडियावर या जाहिरातीला काही युजर्सकडून पाठिंबा मिळत आहे. तर काही युजर्सने या जाहिरातीचा निषेध केला आहे. या जाहिरातीमध्ये दाखवले जाणारे करवा चौथचे सेलिब्रेशन हे हिंदू धर्माची परंपरा आहे आणि त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे काहींचे म्हणणे आहे. तसेच या जाहिरातीद्वारे वर्णभेदाला प्रोत्साहन दिले जात आहे,असे अनेकांचे म्हणणे आहे. या जाहिरातीवर आलेल्या प्रतिक्रीया संमिश्र आहेत. काहींना हिंदू सणाची ही आधुनिक कल्पना भावली, तर काहींनी या कल्पनेचा निषेध केला आहे. दरम्यान, समलैगिंक जोडप्यांना कायदेशीररीत्या मान्यता असली तरी अद्याप समाजने त्यांना स्वीकारले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Waterlogging : नालासोपारा पश्चिम परिसरात पूरसदृश स्थिती; आमदारांच्या कार्यालयातही शिरले पाणी

Horoscope: पुढच्या 48 तासांत बदलतीये ग्रह दशा! चमकणार 'या' 4 राशींचे नशीब; धनलाभासह मिळतील मोठ्या आनंदाच्या बातम्या

Harbhajan Singh याला NCA मधून का हाकललं होतं? २६ वर्षांनी स्वत:च केला मोठा खुलासा; म्हणाला, 'माझी चूक...'

Marathi News Live Updates : रस्ता खड्ड्यात; टोलवसुली मात्र जोरात! घोटी-पडघा टोल नाक्यावर वाहनचालकांचा संताप

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! पुढील २-३ तासात पावसाचा जोर वाढणार, आयएमडीचा इशारा

SCROLL FOR NEXT