netizens support avinash narkar dance video of ganpati and slams trollers SAKAL
मनोरंजन

Avinash Narkar Video: तुम्हाला आहे का हिंमत असं करायची? ‘माझ्या पप्पांनी गणपती...‘ गाण्यावरून नारकरांना ट्रोल करणाऱ्यांना चाहत्यांनी सुनावले

अविनाश नारकर यांच्या डान्सवर टिका करणाऱ्यांना लोकांनी चांगलंच सुनावलं आहे

Devendra Jadhav

Avinash Narkar Video: अभिनेते अविनाश नारकर हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अविनाश नारकर हे उत्तम अभिनेते आहेतच शिवाय सध्या त्यांच्या डान्स रील्समुळे सुद्धा ते लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत.

अविनाश नारकर हे विविध ट्रेडींग गाण्यावर डान्स रील्स बनवत असतात. नुकतंच त्यांनी गणेशोत्सवा निमित्ताने आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर डान्स केला. या व्हिडीओवर खूप लोकांनी टिका केली. पण याच टिका करणाऱ्यांना माणसांना सुनावून काही लोकांनी अविनाश नारकर यांना समर्थन दिलेय.

(netizens support avinash narkar dance video of ganpati and slams trollers)

अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओला सपोर्ट

अविनाश नारकर यांनी काही दिवसांपुर्वी सोशल मिडीयावर आमच्या पप्पांनी गंपती आणला या गाण्यावर रील बनवला. हा रील पाहताच नेटकऱ्यांनी अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओवर टिका केलीय.

पण कमेंटकडे नीट लक्ष दिले तर अविनाश नारकर यांना सपोर्ट करणारे सुद्धा अनेक लोकं पाहायला मिळत. पाहूयात काय कमेंट केल्यात लोकांनी

माणसाने तुमच्यासारखं आनंदी असायला हवं अविनाश

अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओला समर्थन देताना नेटकऱ्यांनी खालील कमेंट्स केल्या आहेत

"अरे मेल्लांनो तुम्हाला आहे का हिंमत अस करायची, तुम्हाला फक्त लोकांना नाव ठेवता येत बाकी काय येणार नाही, ते तर स्वतःच्या बळावर इथं पर्यंत पोहचले. त्याचां स्वभाव खुप छान आहे, आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे, काही करता येत नाही तर नांव तरी ठेऊ नका. Plz..."

"सर खूप मस्त जोडी तुमची..अगदी प्रेरणादायी...यांना जीवन कळले हो...हो ना."

"या धावपळीच्या काळात लोकं जगणं विसरुन जातात. तुमच्या सारखे लोक त्यांचे रील्स व्हिडीओ बघून असं वाटतं की आम्ही स्वतः हे आयुष्य आनंदात जगतोय. थँक यू त्यासाठी."

अविनाश - ऐश्वर्या नारकर यांची जोडी

अविनाश नारकर हे गेल्या काही महिन्यांपासून सोशल मिडीयावर रील्स व्हिडीओ बनवत आहेत. कधीकधी एकट्याने, कधीकधी मालिकेतल्या सहकलाकारांसोबत अविनाश नारकर हे डान्स रील व्हिडीओ बनवत असतात.

अनेकदा त्यांच्या जोडीला त्यांची बायको आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सुद्धा असलेली दिसून येते. अविनाश - ऐश्वर्या या दोघांची जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT