Never ever underestimate any Indian sunny deol tweet after indian team victory against Australia  
मनोरंजन

'सनी भाऊ बोलले, भारतीयांना कधीही कमी समजू नका'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - ये हात जब आदमी पे पडता है ना तब वो आदमी उठता नही उठ जाता है हा संवाद कुणाचा हे कुणालाही लगेचच सांगता येईल. आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण करणा-या सनी देओल यांचा सोशल मीडियावरही प्रचंड फॉलोअर्स आहे, सध्या ते राजकारणात सक्रिय आहेत. ते एका पक्षाचे आमदारही आहेत. मात्र चित्रपटांपासुन त्यांची नाळ काही तुटलेली  नाही. सोमवारी मोठी ऐतिहासिक कामगिरी करुन देशाचे नाव जगभर पोहचवले.

भारत आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटीत भारतानं बाजी मारली. अटीतटीच्या सामन्यात भारतानं विजय मिळवून कोट्यवधी भारतीयांना आनंद साजरा करण्यास भाग पाडले. यावेळी सोशल माध्यमांवरही अनेक सेलिब्रेटींनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता सनी देओल यांनी आपल्या खास अंदाजात भारतीय संघाचे कौतूक केलं आहे. ब्रिस्बेन येथे झालेल्या 4 कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारली आहे. ऋषभ पंत आणि शुभमन गिल हे या सामन्य़ाचे हिरो ठरले.

भारतानं विजय मिळवल्यानंतर संघावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. सनी देओलनं यावेळी व्टिट करुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, भारतीयांना कधीही कमी समजू नका. दुसरीकडे बॉबी देओल यांनी भारतीय संघाचे कौतूक करताना असे लिहिले आहे की, आम्हाला तुमचा गर्व वाटतो. तुम्ही मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

सनी यांच्या व्टिटलाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्याला रिव्टिट करणा-यांची संख्या अधिक आहे. अनेकांनी यावेळी भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. बॉबी देओलनंही आनंद व्यक्त करुन अशाप्रकारच्या ऐतिहासिक क्षणाला साजरे करण्याचा आनंद मिळतो आहे याबाबत समाधान वाटत असल्याचे सांगितले आहे. बॉबी आणि सनी या दोघांच्याही व्टिटला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. भारताला ऑस्ट्रेलियानं 328 धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची फलंदाजी ढासळु लागली असताना एका बाजूनं शुभमन गिलनं किल्ला लढवला. पुढे त्यावर ऋषभ पंतने विजयाची पताका फडकावली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake RTO Website: अवघ्या सात रुपयांमध्ये डुप्लिकेट आरसी बुक! आरटीओच्या बनावट वेबसाइट प्रकरणातील धक्कादायक प्रकार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण’ योजना बंद नाही; काहींना लखपती करणार : मुख्यमंत्री फडणवीस

Supreme Court : मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संपत्तीत हिस्सा देण्यास नकार, सुप्रीम कोर्टानेही वडिलांची दिली साथ; नेमकं काय घडलं?

Shocking : विमान कोसळले! दिग्गज खेळाडूसह कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू, पाच वर्षांचा मुलगा अन् १४ वर्षांची मुलगी आगीच्या तांडवात सापडले

...तर मराठा समाज राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करेल: राज्य समन्वयक महेश डोंगरे; धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून ‘मराठा क्रांती’चा इशारा

SCROLL FOR NEXT