new dayaben coming in Taarak Mehta ka Ooltah Chashmah serial audience get angry reaction sakal
मनोरंजन

'दिशा वकानी येणार नसेल तर..' नव्या 'दयाबेन'च्या येण्यावरुन चाहते भडकले..

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत 'दयाबेन' परत येणार आहे पण हे पात्र दिशा वकानी साकरणार नसल्याने चाहते नाराज झाले आहेत.

नीलेश अडसूळ

Taarak Mehta ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उलटा चश्मा' हा सध्या टेलीव्हिजन विश्वातील हॉट टॉपिक आहे. (Tarak Mehta ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असून गेली अनेक वर्ष या मालिकेतील कलाकारही घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरले आहे. पण गेल्या काही दिवसांत या मालिकेसंदर्भात चाहत्यांना नाराज करणाऱ्या अनेक गोष्टी कानावर पडत आहेत. मालिकेतील बरेच कलाकार सध्या मालिकेला निरोप देत आहेत. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत लोक दयाबेनला पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. दयाबेनची (dayaben) भूमिका दिशा वकानी (disha vakani) साकारत होत्या. सध्या दिशाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून ती मालिकेत येणे शक्य नाही. पण लवकरच नवीन दया मालिकेत परत येणार असल्याचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. मात्र चाहत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (new dayaben coming in Taarak Mehta ka Ooltah Chashmah serial audience get angry reaction) (disha vakani not returning in tarak mehta)

या मालिकेत दया बेन ये सर्वाधिक लोकप्रिय पात्र आहे. अभिनेत्री दिशा वकानी हे पात्र साकारत होत्या. मात्र मागच्या ५ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधून त्यांनी ब्रेक घेतला आहे. २०१७ मध्ये प्रेग्नंसीच्या कारणानं दिशानं या शोमधून ब्रेक घेतला होता. आज पाच वर्षे झाली तरी दिशाच्या भूमिकेची जादू कमी झालेली नाही. लोक आजही दया बेनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सध्या मालिकेतील अनेक कलाकार निरोप घेत असल्याने नुकत्याच एका मुलाखतीत मालिकेचे निर्माते म्हणाले होते की, 'दयाबेन आता पुन्हा एकदा दिसणार आहे. मात्र ही भूमिका दिशा वकानी साकारणार नाही. दिशाच्या रिप्लेसमेंटसाठी ऑडिशन सुरू आहेत आणि लवकरच नवी अभिनेत्री दयाबेनची भूमिका साकारताना दिसेल. आम्हाला अपेक्षा होती की, दिशा परत येईल. कारण दिशा आणि शोचं खूप जुनं नातं आहे त्यामुळा आम्ही वाट पाहण्याचा निर्णय घेतला. आजही दिशा आमच्या कुटुंबाचा भाग आहे. पण तिने घेतलेल्या कुटुंबिक जबाबदारीचाही आम्हाला आदर आहे.'

त्यानंतर दिशा दुसऱ्यांदा आई झाल्याची बातमी समोर आली आणि दिशा मालिकेत परतणार नाही याची खात्री प्रेक्षकांना झाली. नुकताच मालिकेचा एक प्रोमो रिलीज झाला ज्यामध्ये दयाबेन येत असल्याचे दिसत आहे. पण आता ही भूमिका नवी अभिनेत्री साकरणार असून चाहते यावर नाराज झाले आहेत. एक चाहता म्हणतो, 'मला वाटलंच होतं असंच होईल. तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे, ‘दिशा शोमध्ये दिसणार नसेल तर मग आता हा शो बंद करा. कमीत कमी आता पर्यंत जे लोकप्रियता मिळवली ती तरी कायम राहिल. पुन्हा पुन्हा जुन्या स्टोरी दाखवण्याची गरज नाही.’ तर काही युजर्सनी तर मेकर्सना थेट धमकीच दिली आहे. एका युजरनं लिहिलं, ‘आता पुन्हा दयाबेनच्या घरी परतण्यावरून काही गेम खेळलात तर पाहा मी हा शोच बंद करून टाकेन. कारण तसंही आता या शोची लोकप्रियता कमी होत चालली आहे.' अशी नाराजी चाहते व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT