New film marathi esakal news
New film marathi esakal news 
मनोरंजन

प्रेक्षकांना मिळणार आगळंवेगळं 'बिस्किट '!!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आतापर्यंत गमतीशीर नावांचे अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, आता प्रेक्षकांना आगळंवेगळं बिस्किट' चाखायला मिळणार आहे. "बिस्किट" या नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. 

एक्स्पान्शन फिल्म्स प्रा. लि.च्या पद्मश्री शेवाळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून कथा ही त्यांचीच आहे. रवींद्र शेवाळे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. सचिन दरेकर यांची पटकथा, नामदेव मुरकुटे यांचे संवाद, किशोर राऊत यांचे छायांकन आणि चैतन्य आडकरचे सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभले आहे. अभिनेते शशांक शेंडे, पूजा नायक , जयंत सावरकर, अशोक समर्थ आणि बालकलाकार दिवेश मेदगे यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. एका लहान मुलानं घेतलेल्या विलक्षण शोधावर हा चित्रपट बेतला असून या टीजर पोस्टरनं चित्रपटाविषयी कमालीची  उत्सुकता निर्माण केली आहे. 

आता हे "बिस्किट" आजवरच्या चित्रपटांपेक्षा किती वेगळं आणि चविष्ट आहे, यासाठी चित्रपट प्रदर्शित होण्याची थोडी वाट पहावी लागणार असून येत्या नोव्हेंबर महिन्यात ह्या "बिस्किट" चा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT