new Marathi movie mangalashtaka returns actor vrushabh shah and shital ahirrao casting photo viral on internet  
मनोरंजन

'मंगलाष्टक रिटर्न' मध्ये झळकणार वृषभ शहा, शीतल अहिरराव; फोटो व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - मराठी सिनेसृष्टी चित्रपटगृह हाऊसफुल करण्यासाठी सज्ज झाली आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या कथा, सादरीकरण यासह आता सिनेमात कलाकारांच्या नव्या फ्रेश जोड्या आणण्याकडेही सिनेमाकर्त्यांचा कल आहे. नवीन जोड्यांचा हा ट्रेंड सुरू असताना लवकरच अभिनेता वृषभ शहा आणि  अभिनेत्री शीतल अहिरराव यांच्या नव्या जोडीची पर्वणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच एकत्र काम करत असलेल्या या कलाकारांची पडद्यावरील नवी केमिस्ट्री निर्माता वीरकुमार शहा आणि 'शारदा प्रॉडक्शन' या प्रॉडक्शन हाऊसतर्फे प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक योगेश भोसले यांनी सांभाळली आहे.

अभिनेत्री शीतल अहिरराव आणि अभिनेता वृषभ शहा 'मंगलाष्टक रिटर्न' या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. कलाकार म्हणून अंगी असलेल्या मनोरंजन क्षेत्रातल्या या नव्या  उभारत्या ताऱ्यांच्या कलेला साऱ्याच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. सातत्याने नवे कोरे आणि चौकटी बाहेरचे विषय असलेले चित्रपट स्वीकारणारी शीतल आणि दमदार भूमिका स्वीकारत नवकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला वृषभ शहा या चित्रपटातून आपली कला नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर उमटवतील यांत शंकाच नाही.

विशेष म्हणजे 'घटस्फोट लग्नसोहळा' ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट याच 'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटातील आहे, नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून थिएटर चालू होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात अटी शर्थीचे पालन करत आणि कलाकारांच्या मदतीने या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्णत्वास आले आहे. चित्रपटाचे विषयघन आणि गमतीदार नावासह आणि चित्रपटातील कलाकारांबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांनाही आतुरता 
लागून राहिली आहे.

या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, आनंद इंगळे, प्रसन्न केतकर, कमलेश सावंत, भक्ती चव्हाण हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. पुन्हा एकदा उभारती अशी ही जोडी वेगळ्या धाटणीच्या या सिनेमातून  सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य नक्कीच गाजवेल याची खात्री आहे. शीतल आणि वृषभ यांच्या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास सिनेरसिकही उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT