kusum 
मनोरंजन

'लागीरं झालं जी' फेम शिवानी बावकर नव्या भूमिकेत

'तुमच्या आमच्यातली कुसुम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्वाती वेमूल

सोनी मराठी वाहिनीवर 'कुसुम' Kusum ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. 'लागीरं झालं जी' या मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी बावकर Shivani Baokar या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'शीतली' या व्यक्तिरेखेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. आता सासर आणि माहेर अशा दोन्ही घरातील जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे.

लोकलमध्ये तिची मैत्रीण तिला संध्याकाळी मिसळ पार्टी करण्याबद्दल विचारते, तेव्हा 'बाबांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे', असं ती सांगते. त्यावर 'अजूनही तूच करतेस त्या घरचं?' असं तिची मैत्रीण विचारते. त्यावर कुसुम तिला विचारते की, 'सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची गरज आहे का?' अनेक मुलींच्या मनातला प्रश्न तिने यात बोलून दाखवला आहे. कुसुम असं तिच्या भूमिकेचं आणि नव्या मालिकेचं नाव आहे.

शिवानीने शितलीची भूमिका साकारत अनेकांच्या मनात घर केलं. मालिकेतील तिचा अनोखा अंदाज प्रेक्षकांच्या मनावर जादू करत होता. मालिकेनंतर तिचा म्युझिक व्हिडीओसुद्धा प्रदर्शित झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT