anushka sharma 
मनोरंजन

प्रेग्नंसीनंतरही जशी आहे तशीच; अनुष्काचा सेल्फी पाहून नेटकरी अवाक्!

स्वाती वेमूल

बाळंतपणानंतर स्त्रियांचं वजन वाढणं स्वाभाविक असतं. याला मग सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नसतात. बाळंतपणानंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. शिल्पा शेट्टी, करिना कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी योगसाधना, व्यायामचा आधार घेत वजन कमी केल्याचं पाहायला मिळालं. मात्र नुकतीच आई झालेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेल्फी पोस्ट केला आहे. प्रेग्नंसीनंतरही अनुष्का जशी आहे तशीच यात पाहायला मिळतेय.

अनुष्काने आरशात पाहत हा सेल्फी काढला असून तिच्या एका खांद्यावर बाळाचा कपडा पाहायला मिळतोय. 'माझी सध्याची सर्वांत आवडती अॅक्सेसरी' असं म्हणत तिने हा फोटो पोस्ट केला आहे. ११ जानेवारी रोजी तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर पहिल्यांदाच अनुष्काने सोशल मीडियावर सेल्फी पोस्ट केला आहे. या फोटोतील तिचं फिटनेस पाहून नेटकरीसुद्धा अवाक् झाले आहेत. 

अनुष्काच्या या फोटोला केवळ सहा तासांत वीस लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या फोटोच्या कमेंटमध्ये अनेकांनी तिला मुलगी वामिकाचा फोटो पोस्ट करण्याची विनंती केली आहे. मात्र विराट-अनुष्काने बाळाला सोशल मीडिया आणि पापाराझींपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 'विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आम्ही खूप विचार केला. पण आम्ही आमच्या मुलीला सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही', असं अनुष्काने स्पष्ट केलं होतं. बाळंतपणानंतर अनुष्का-विराटने मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र यामध्ये तिचा चेहरा पाहायला मिळत  नाही. मुलीचं नाव वामिका ठेवल्याची माहिती त्यांनी या फोटोद्वारे चाहत्यांना दिली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली १५ वर्षांची भारतीय नेमबाज अखेर सापडली! पोलीस तपासात कोणतं कारण समोर आलं?

Success Story: 1.5 लाखांची मुंबईतील नोकरी सोडून गावाकडे आला; आता महिन्याला कमावतोय 4 लाख रुपये! काय आहे गुंतवणुकीचा मंत्र?

Latest Marathi News Live Update : रामभक्तांवर रामरक्षा करण्याची वेळ भाजपानं आणली - उद्धव ठाकरे

Tukaram Mundhe : 'एआय'च्या मदतीने अन्नभेसळखोरांवर नजर! नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा इतिहास मिळणार एका क्लिकवर

Car Accident : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; परभणी जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT