pooja Bhatt returns to acting with netflix original series Bombay begums  
मनोरंजन

पूजा भट्टला विसरलात का? दहा वर्षानंतर नव्या भूमिकेत

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - नेटफ्लिक्सच्यावतीने प्रदर्शित करण्यात येणा-या बॉम्बे बेगम्समध्ये बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री पूजा भट्ट दिसणार आहे. पूजानं काही मोजकेच सिनेमे केले. मात्र ते प्रेक्षकांच्या मनात आहेत. त्यातील पूजाच्या अभिनयानं खास ओळख तयार केली होती. गेल्या काही वर्षांपासून ती चित्रपट आणि छोट्या पडद्यापासून दूर होती. ते तिनं जाणीवपूर्वकच केलं होतं. काही कौटूंबिक कारणामुळे तिनं अभिनय सोडल्याची चर्चा होती. आता ती पुन्हा कमबॅक करण्यासाठी तयार झाली आहे.

पूजानं तिच्या नव्या सीरिजचा फ़र्स्ट लूक शेअर केला आहे. सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळत आहे. या सीरिजमध्ये पूजाबरोबर अमृता सुभाष, शहाना गोस्वामी, प्लाबिता बोरठाकूर आणि आध्या आनंद यांची महत्वाची भूमिका आहे. या पाचही अभिनेत्रींचा फोटो त्या कव्हरवर आहे. जो प्रेक्षकांना आवडला आहे. 10 वर्षांपासून अभिनयापासून दूर असणा-या पूजा भट्टनं नेटफ्लिक्स बरोबर काम कऱण्याचा घेतलेला निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे. पूजाची ही नवीन मालिका 8 मार्च म्हणजे महिला दिनाच्या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्या सीरिजचा फ़र्स्ट लूक हा मंगळवारी प्रदर्शित झाला.

मालिकेच्या माध्यमातून पाच महत्वकांक्षी महिलांची कथा मांडण्यात आली आहे. काही झाले तरी आपल्या ध्येयापासून मागे न हटता त्या यश मिळवतात. त्यांची संघर्षगाथा मालिकेच्या माध्यमातून पुढे येणार आहे. पूजानं ज्यावेळी फ़र्स्ट लूक ज्यावेळी शेअर केला तेव्हा सोशल मीडियावर लिहिलं आहे की, उठा आणि जागे व्हा, स्त्री पेक्षा कोणी शक्तिशाली नाही. तिनंच स्वताला घडवले आहे. आणि मला आता हे सांगायला आनंद होतो आहे की मी पुन्हा आले आहे. बॉम्बे बेगम्स मधून मी केलेलं पुनरागमन सर्वांना आवडेल अशी आशा आहे.

बॉम्बे बेगम्सचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव यांनी केले आहे. स्त्री वादी भूमिका घेऊन समाजात महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार यांच्याविरोधात आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे काम श्रीवास्तव यांनी केले आहे. यापूर्वी त्यांच्या लिपस्टीक अंडर माय बुरखा आणि डॉली किट्टी और वो चमकते सितारे यासारख्या चित्रपटातून अलंकृतानं एक वेगळी शैली प्रेक्षकांसमोर मांडली आहे. हा चित्रपट काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. पूजानं जेव्हा आपण कमबॅक करत असल्याचे सांगितले तेव्हा अनेक सेलिब्रेटींनी तिचे कौतूक करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

SCROLL FOR NEXT