Karan Johar Rani Mukerji New Year 2024: Esakal
मनोरंजन

karan johar: सरत्या वर्षात काय शिकलो? करण जोहर सोडणार नाही instagram ? ट्रोलला दिलेलं उत्तर viral

बॉलीवूड सेलिब्रिटींनी नवीन वर्ष धूमधडाक्यात साजरा केले आहे. तर दुसरीकडे करण जोहरची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Vaishali Patil

Karan Johar Rani Mukerji New Year 2024: सध्या सर्वत्र नववर्षांची धामधूम पहायला मिळत आहे. त्यातच अनेक बॉलिवूड कलाकारही आपल्या जोडीदारासोबत नववर्ष साजरा करत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या काही फोटो देखील शेअर केले आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटींनी नवीन वर्ष धूमधडाक्यात साजरे केले.

रणदीप अन् लिनने केरळमध्ये तर करीना-सैफने स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाचे स्वागत केले त्याचबरोबर आता करण जोहरने देखील त्याच्या न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

करण जोहरने अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत नव्या वर्षाचे स्वागत केले. याचे काही फोटो करणने सोशल मिडियावर शेयर केले आहेत. यासोबत करणने त्याला ट्रोल करणाऱ्यांसाठी एक पोस्ट देखील शेयर केली आहे.

या फोटोत करण जोहर आणि राणी मुखर्जीही ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले. करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर हे फोटो शेयर केले. हा फोटो शेअर करत करणने लिहिले, "अमी रानी... 2024!"

तर पुढच्या पोस्टमध्ये करण जोहरने त्याला ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. या पोस्टमध्ये तो 2023 मध्ये काय शिकला हे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. त्याने लिहिले, “2023 मध्ये शिकलेला माझा एकमेव धडा! कुछ तो ट्रोल कहेंगे ट्रोलन का काम है ट्रोलना छोडों बेकार की बातों में कहीं बीत ना जाए इंस्टा!”

यासोबतच करणने त्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलाच टोमणा मारला आहे. सध्या करणची पोस्ट व्हायरल होत आहे. नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत तर काहींनी पुन्हा त्याला ट्रोल केलं आहे.

करण जोहर सध्या कॉफी विथ करण मुळे चर्चेत आहे. यंदा या शोचा 8 वा सिझन सुरु आहे. आता शोमध्ये जान्हवी कपुर अन् खुशी कपुर दिसणार आहेत तर दुसरीकडे त्याने गेल्या वर्षी आलिया भट्ट आणि रणवीर सिंग स्टारर रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता तो आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Latest Marathi News Live Update : गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार- चंद्रशेखर बावनकुळे

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT