news about ramshej marathi movie starcast release date songs poster out now  SAKAL
मनोरंजन

Ramshej Movie: नाशिकचा रामशेज किल्ला अन् मावळ्यांचा पराक्रम, नवीन ऐतिहासीक सिनेमात तगडी स्टारकास्ट

अलीकडेच ३५० वा राज्याभिषेक झाला. त्यानिमित्ताने रामशेज या नव्या सिनेमाची घोषणा आलीय

Devendra Jadhav

Ramshej Marathi Movie News: सध्या अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच आणखी एक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

अलीकडेच ३५० वा राज्याभिषेक झाला. त्यानिमित्ताने रामशेज या नव्या सिनेमाची घोषणा आलीय. सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं असुन या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधुन घेतलंय.

(news about ramshej marathi movie starcast release date songs poster out now)

पोस्टरमध्ये रामशेज किल्ला दिसत असुन तिथे महाराजांचा मावळा दिसत आहे. याशिवाय श्रीरामांची छबी दिसत असुन त्यावर रामशेज असं ठळक अक्षरात लिहीलेलं दिसतंय.

या सिनेमातुन ऐतिहासीक रामशेजची कथा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली असुन लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रामशेजमध्ये असलेले कलाकार

रामशेजमध्ये तगड्या कलाकारांची फौज आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अभिनेता अंकीत मोहन, रमेश परदेशी असे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत.

रामशेज सिनेमाचं शुटींग लवकरच सुरू होणार आहे. रामशेज सिनेमातुन नाशिकचा रामशेज किल्ला आणि त्यामागचा इतिहास उलगडणार आहे.

रामशेजचा इतिहास

रामशेज किल्ला नाशिक शहराच्या उत्तरेस आहे, आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. इतिहास असा आहे की, किल्ल्यावर मुघलांनी (औरंगजेबाच्या सैन्याने) हल्ला केला होता

आणि त्याच्या सेनापतींनी मराठा राज्याला धमकी दिली होती की ते काही तासांत किल्ला काबीज करतील.

शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी आणि त्यांच्या सैन्याने जवळपास ६ वर्षे या हल्ल्यांचा प्रतिकार केला. या कडव्या प्रतिकाराची गाथा रामशेज सिनेमातुन पहायला मिळणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT