Newton Got Best Hindi Movie In National Movie Award  
मनोरंजन

असा आहे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट 'न्यूटन'

सकाळ डिजिटल टीम

'न्यूटन' हा हिन्दी चित्रपट बराच गाजला. अभिनेता राजकुमार राव याच्या न्यूटन या मुख्य पात्रासोबतच अभिनेत्री अंजली पाटील हिच्या मल्को, पंकज त्रिपाठी यांच्या पोलिस ऑफिसर या पात्रांना प्रेक्षकांनी खुप पसंत केले. मराठमोळा निर्माता अमित मसुरकरचा हा चित्रपट आहे.

उपहासात्मक कॉमेडी ड्रामा असलेला हा चित्रपट नक्षली भागातील खऱ्या परिस्थितीवर भाष्य करणारा आहे. छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांचे साम्राज्य आहे. येथील जंगली भागात राहणाऱ्या लोकांवर तर सतत नक्षल्यांची भीती ठाण मांडून असते. अशात जर कधी येथे निवडणुकांची वेळ आली तर नक्षल्यांच्या भीतीने मतदानही होत नाही. हे मतदान रितसर पार पडावे यासाठी स्थानिक प्रशासनही नक्षल्यांच्या भीतीने धजावत नाही. ही सगळी परिस्थिती चित्रपटात मांडली आहे.  

या चित्रपटाने प्रेक्षकांची जशी वाहवाई मिळवली तसाच पुरस्कारांच्या बाबतीतही हा चित्रपट सरस ठरला आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटीक्सचा बेस्ट इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड आणि नेटवर्क फॉर द प्रोमोशन ऑफ एशियन सिनेमाज् चा बेस्ट एशियन फिल्म अवॉर्ड 'न्यूटन'च्या खात्यात जमा आहेत. आता 'न्यूटन'ची 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात वर्णी लागली आणि 'न्यूटन'ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. अभिनेता राजकुमार राव याने चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ट्विट करत आनंद व्यक्त केला.  



आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Investment Rule: पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय! गुंतवणूक नियमांमध्ये मोठे बदल, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, कसा फायदा होणार?

IPL 2026 Auction पूर्वी भारतीय गोलंदाजाची शैली वादात; फ्रँचायझीने पैसा लावण्यापूर्वी करावा विचार, त्याच्यावर बंदीची टांगती तलवार...

Navi Mumbai Airport: फ्लाइट सुरू होण्यापूर्वीच नवी मुंबई विमानतळावर घुसखोरी; एकाला अटक, नेमकं काय घडलं?

Satara Drug Bust : साताऱ्यात खळबळ! सावरीतील शेडवजा फॅक्टरीत १५ कोटींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त, मुंबई पोलिसांची गुप्त कारवाई

Solapur Railway News: पूल पाडकामासाठी सोलापुरात रविवारी मेगा ब्लॉक; ९ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT