Priyanka Chopra,Nick Jonas
Priyanka Chopra,Nick Jonas Google
मनोरंजन

प्रियंका हॉलीवूडमध्ये मग्न अनं जोनास भावोजींना बॉलीवूडचे स्वप्न!

प्रणाली मोरे

एकेकाळची भारतीय विश्वसुंदरी आणि बॉलीवूडची सुपरस्टार प्रियंका चोप्रानं(Priyanka Chopra) अमेरिकन सिंगर निक जोनासशी(Nick Jonas) लग्न केलं आणि कायमची अमेरिकावासी झाली. आता इतपत ठीक होतं पण सध्या प्रियंका हॉलीवूडमध्ये जास्तच काम करताना दिसतेय. आणि अगदी त्यातनं वेळ उरला तर ती बॉलीवूडचा एखादा सिनेमा करतेय. पण असं असलं तरी सोशल मीडियावर अधनंमधनं भारताविषयी आपलं प्रेम व्यक्त करणारे व्हिडीओ पोस्ट करायला ती विसरत नाही. अर्थात अमेरीकेतही राहताना ती आपण कसे भारतीय संस्कार-परंपरा जपतोय याचेही दाखले आपल्या पोस्टच्या-व्हिडीओच्या माध्यमातनं देत असते. मागे तिने आपल्या लॉस एंजलिस येथील नवीन घरात गृहप्रवेशाची पूजा केल्याचे फोटो पोस्ट केले होते. ही पुजा प्रियंकाचा नवरा निक जोनासनेही मनापासून एन्जॉय केल्याचं फोटोमध्ये दिसत होतं.

निक जोनास हा अमेरिकेचा. तिथेच जन्मलेला,वाढलेला. पण प्रियंकाला त्यानं तिच्या ३६व्या वाढदिवसाच्यावेळी एका रोमॅंटिक ठिकाणी प्रपोज केलं,आणि लग्नासाठी विचारलं. प्रियंकानं निक आणि आपल्या वयातील जवळ-जवळ दहा वर्षाचं अंतर पहाता थोडा विचार करून होकार कळवला. राजस्थानमध्ये राजेशाही थाटात या दोघांचं लग्न झालं. निक आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने भारतात त्यावेळी धम्माल केली. चोप्रा आणि जोनास आता ब-यापैकी एकमेकांच्या संस्कारांमध्ये मिसळून गेले आहेत. इतकंच काय तर प्रियंकाने बॉलीवूडपासनं थोडा दुरावा साधत हॉलीवूडला जवळ केलंय. मग निक तिचा नवरा कसा मागे राहील. त्यानेही नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलीवूड संदर्भात बरेच खुलासे केले.

त्याने म्हटलंय,"माझं लग्न प्रियंकासोबत झाल्यापासनं मी खूप भारतीय सिनेमे पाहिले आहेत. म्युझिक ऐकलंय. मी भारतात लग्न आणि त्यानंतर ज्या-ज्या कार्यक्रमांच्या निमित्ताने गेलो आहे त्यावेळी मी खूप बॉलीवूडमधल्या लोकांना भेटलोय. त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या आहेत. आणि ते सगळंच खूप प्रोत्साहनवर्धक होतं. प्रियंकाही नेहमीच आमच्या घरी पार्टी असली की भारतीय म्युझिकला प्राधान्य देते. आमच्या घरी येणारे मग ते केवळ भारतीय पाहुणेच नाहीत तर अमेरिकन्सही मनापासून एन्जॉय करीत धम्माल त्या बीट्सवर नाचतात. मी एकाच शब्दात भारतीय सिनेमाविषयी-म्युझिकविषयी म्हणेन,'अभुतपूर्व'. मला अशा उच्च दर्जाच्या सिनेइंस्ट्रीत काम करायला नक्कीच आवडेल. मी आता वाट पाहतोय ती एका चांगल्या ऑफरची".

काही दिवसांपूर्वीच प्रियंकानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरन 'जोनास' हे आडनाव हटवलं होतं. तेव्हा निक-प्रियंका घटस्फोट घेतायत या बातम्यांना ऊत आला होता. अर्थात प्रियंकानं हे सगळं निकच्या 'जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट' या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी केल्याचं कळलं तेव्हा त्यांच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. प्रियंका-नीकनं या अफवेमुळे 'शो' ला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आपल्या चाहत्यांचे धन्यवाद व्यक्त केलेत. दोघेही लवकरच लंडन इथे होणा-्या ब्रिटीश फॅशन अॅवॉर्ड्स शोमध्ये एकत्र हजेरी लावणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT