Nikita Rawal Robbed Of 3 5 Lakh Rupees And Jewellery At Gunpoint  Esakal
मनोरंजन

Actress Nikita Rawal: बंदुकीचा धाक दाखवून अभिनेत्रीच्या घरी लाखोंची चोरी! रोख रक्कम आणि दागिने केले लंपास

निकिता रावलच्या घरात लाखोंची चोरी! अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार केली दाखल..

Vaishali Patil

Nikita Rawal: बॉलीवूड अभिनेत्री निकिता रावलबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निकिता रावलला तिच्या राहत्या घरी बंदुकीचा धाक दाखवत तिच्याच घरातील एका कर्मचाऱ्याने लुटले आहे.

पिस्तूल मानेवर ठेवत चोरट्यांनी निकिताचे दागिने आणि रोख साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांपैकी एक निकिताच्या घरी काम करणारा नोकर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने टोळीतील इतर काही सदस्यांसह योजना आखली होती. घरात कुणीही नसताना त्याने हा डाव साधला.

मात्र आश्चर्यांची गोष्ट म्हणजे निकितासोबत चोरीची घटना दुसऱ्यांदा घडली आहे. त्यामुळे निकिता खुपच घाबरली आहे. याआधीही दोन वर्षांपूर्वी बंदुकीच्या धाक दाखवून तिच्याकडून सुमारे सात लाख रुपये लुटण्यात आले होते.

आता निकिताने मुंबईच्या मालाड बांगूर नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. निकिता म्हणाली की तिने एफआयआर दाखल केला आहे आणि दोषींना अटक करण्यासाठी आणि तिचे पैसे आणि दागिने मिळवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

"मला प्रचंड धक्का बसला आहे. माझ्या घरातीलच एका कर्मचाऱ्याने असं केलं आहे यावर माझा विश्वास बसत नाही.

लोक आधी विश्वास संपादन आणि नंतर त्याचा असा गैरवापर करतात हे खुपच त्रासदायक आहे. त्या चोरट्यांनी साडेतीन लाख रुपये आणि सर्व दागिने हिसकावले आहेत जे मी खूप मेहनतीने जमा केले होते."

निकिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अनिल कपूरसोबत ब्लॅक अँड व्हाईट, जॉनसोबत गरम मसाला या चित्रपटांशिवाय अनेक बॉलिवूड आणि टॉलीवूड काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VRSची विमानसेवा न वापरण्याचा शिवसेना शिंदे गटाचा निर्णय, शिंदेंच्या मंत्र्यांनीच दिली माहिती

Bribery Case Kolhapur : पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० लाखांची मागणी, तिघांनी लुटायचा प्लॅन आखला पण पोलिसांनी

Latest Marathi News Live Update : अमरावतीमध्ये कार दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू ५ गंभीर जखमी

Sindhudurg News: ऐतिहासिक निर्णय! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ गावं इको सेन्सिटिव्ह, अंतिम अधिसूचना जारी..

Sakal Kolhapur : 'सकाळ' दिवाळी अंकास सलग दुसऱ्यावर्षी राज्यस्तरीय पुरस्कार; मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे गौरव

SCROLL FOR NEXT