nikki tamboli  Team esakal
मनोरंजन

Khatron Ke Khiladi 11: सापांसोबत खेळतेय निक्की, डोळ्यावर झुरळं

सध्या बिग बॉस फेम निक्की तांबोळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - खतरो के खिलाडीचा 11 वा सीझन आता लवकरच सुरु होणार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून त्याचं साऊथ आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये शुटिंग सुरु होतं. यंदाच्या सीझनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक आपआपलं शुट संपवून घरी परतण्याच्या तयारीत आहे. सोशल मीडियावर या रियॅलिटी शो ची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.कलर्स वाहिनीनं आपल्या इंस्टाग्रामवरुन मालिकेच्या प्रमोशनला सुरुवातदेखील केली आहे. सध्या बिग बॉस फेम निक्की तांबोळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये निक्की स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आताच्या या रियॅलिटी शो मध्ये तिचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट चाहत्यांच्या कौतूकाचा विषय ठरत आहे. आता जो निक्कीचा प्रोमो समोर आला आहे त्यात ती रडताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे तिला साप आणि झुरळांनी घेरले आहे. अशाप्रकारचा स्टंट करुन तिनं चाहत्यांना धक्का दिला आहे. तिनं तो व्हिडिओ सोशल मीडियावरही शेयर केला आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

त्या व्हिडिओमध्ये तिच्या जोडीला रोहित शेट्टी देखील दिसत आहे. निक्कीला पाहून त्या इव्हेंटमध्ये सहभागी होणारा अर्जुन बिजलानी देखील घाबरला आहे. हा व्हिडिओ पाहून या कलाकारांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं हे पाहायला मिळालं आहे. टेलि चक्करनं दिलेल्या माहितीनुसार राहुल वैद्य, विशाल आदित्य सिंग आणि वरुण सुद यांनी टॉप 3 मध्ये जागा मिळवली आहे. आता हे या तिघांमधील कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी दिव्यांका त्रिपाठीनं तिला घाबरवून टाकणारा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात ती एका मगरीशी खेळताना दिसली. तिला पाहून श्वेता तिवारी आणि आस्था गिल या कमालीच्या घाबरलेल्या दिसत होत्या. त्या व्हिडिओला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक...

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT