nilesh sabale viral photo with vilasrao deshmukh chala hawa yeu dya SAKAL
मनोरंजन

Marathi News: विलासराव देशमुख यांच्या शेजारी असलेल्या या विनोदविराला ओळखलं का? आज गाजवतोय मराठी इंडस्ट्री

विलासराव देशमुख यांच्या शेजारी असलेल्या विनोदविराला ओळखलं का?

Devendra Jadhav

एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख दिसत आहेत. आणि त्यांच्या शेजारी एक मुलगा आहे. हा मुलगा आज एक लोकप्रिय विनोदवीर म्हणुन महाराष्ट्रात स्वतःचं नाव कमावतोय.

तुम्हीही ओळखलं का या विनोदवीराला? नसेल ओळखलं तर आम्ही सांगतो. हा विनोदवीर दुसरा तिसरा कोणी नसुन तो आहे चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे.

निलेश साबळेने शेअर केली विलासरावांसोबतची खास आठवण

निलेश साबळेने विलासरावांसोबतची खास आठवण शेअर केलीय. यात निलेश लिहीतो, "मेडिकल कॉलेज ला शिकत असताना .. inter university competition इंद्रधनुष्य या स्पर्धेचा विजेता झालो .. त्या वेळचे माननीय मुख्यमंत्री ‘विलासरावजी देशमुख’ यांच्या हस्ते बक्षिस स्वीकारण्याचा अभिमानास्पद क्षण .. आणि पाठीवर ठेवलेले शाबासकीचे हात .. खूप काही करण्याची प्रेरणा देऊन गेले."

निलेशने चला हवा येऊ द्या बद्दल सांगितली महत्वाची अपडेट

चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चला हवा येऊ द्या ऑफ एअर जाणार असल्याचं सांगितलं आहे. निलेश म्हणाले, "गेली ९ वर्ष चला हवा येऊ द्या शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. तुर्तास झी मराठीने चला हवा येऊ द्या शो थांबवण्याचा निर्णय घेतलाय."

निलेश साबळे चला हवा येऊ द्याचं नवीन पर्व घेऊन येणार?

निलेश लवकरच चला हवा येऊ द्याचं नवीन पर्व घेऊन येणार असल्याची चर्चा आहे. निलेशने याविषयी सांगितले, "चला हवा येऊ द्या च्या माध्यमातुन शोमधील कलाकारांना खुप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. प्रत्येकाला आयुष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. पण तुर्तास थांबण्याचा निर्णय घेत आहोत. पण काही महिन्यांनी नवीन पर्वाच्या माध्यमातुन आम्ही पुन्हा भेटीला येऊ"

चला हवा येऊ द्याच्या निमित्ताने निलेश साबळे आणि शोमधले इतर कलाकार म्हणजेच भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे अशा अनेक कलाकारांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT