Gargi Phule, nilu phule, ncp, ajit pawar SAKAL
मनोरंजन

Gargi Phule: निळू फुलेंची लेक गार्गी फुले अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

गार्गी फुले यांच्या निमित्ताने आणखी एक मराठी अभिनेत्री राजकारणात प्रवेश करतेय.

Devendra Jadhav

Gargi Phule In Politics Enter Into NCP News: ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री असलेली गार्गी फुले यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार, जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. यानिमित्ताने गार्गी फुले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. अशाप्रकारे गार्गी फुले यांच्या निमित्ताने आणखी एक मराठी अभिनेत्री राजकारणात प्रवेश करतेय.

(nilu phule daughter Gargi Phule will join ncp today in the presence of Ajit Pawar)

गार्गी फुले या ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या कन्या आहेत. निळू फुले यांनी आजवर खलनायकी भूमिका साकारल्या. पण वडिलांच्या अगदी विरुद्ध गार्गी फुले यांनी सिनेमा आणि मालिका विश्वात अभिनय केला. निळू फुलेंच्या नावाचा प्रभावी वापर न करता काहीशा उशिराच गार्गी या अभिनय क्षेत्रात दाखल झाल्या.

गार्गी यांनी जिद्दीने नाटक-सिनेमा क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले. गार्गी फुले यांनी पुण्यातील अभिनय विद्यालयातून शिक्षण घेतले तर मुंबई युनिव्हर्सिटी तुन MA ची पदवी प्राप्त केली आहे. १९९८ मध्ये अभिनेत्री गार्गी फुले यांनी पहिलं नाटक केलं ते एलकुंचवारांचं 'सोनाटा' आणि नाट्यक्षेत्रात पाऊल ठेवले.

झी मराठीवरील मालिका ”तुला पाहते रे” मध्ये ‘ईशा‘च्या आईची भूमिका साकारली होती. या आधीही झी युवा वाहिनीच्या ‘कट्टी बट्टी’ या मालिकेत त्या पाहायला मिळाल्या होत्या. सप्टेंबर २००७ मध्ये गार्गी फुले यांचे लग्न झाले असून त्यांच्या पतीचे नाव ओंकार थत्ते असे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; आठव्या वेतन आयोगात नेमकं काय ठरणार?, चर्चा निर्णायक टप्प्यात

Nagpur Cyber Fraud: डिलिव्हरी बॉयच्या मुखवट्याआड उभारले ठकबाजांचे साम्राज्य; महिला अटकेत, तिघे फरार; ‘म्युल’ खात्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

Sangli Road Accident : ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्ता शोधायला निघाले अन्...; सांगलीत उड्डाणपुलावर भीषण अपघात, कारच्या धडकेत 24 वर्षीय डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी अंत

Koyna Dam: नवजाला ९१ मिमी पाऊस! कोयना धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसीवर, महाबळेश्वरला उघडीप तर कोयनानगरला पाऊस सुरूच

Sadabhau Khot: 'देशात जगणं स्वस्त, मरणं महाग झालंय': सदाभाऊ खोत, फुकट धान्य आणि अनुदान थांबवा

SCROLL FOR NEXT