nipun dharmadhikari
nipun dharmadhikari 
मनोरंजन

बापजन्म या निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित सिनेमाची झाली घोषणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : युवा आणि प्रतिभाशाली दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत मराठी चित्रपट ‘बापजन्म’ १५ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’चे संजय छाब्रिया, सुमतिलाल शाह व ‘सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्स’तर्फे ही घोषणा करण्यात आली.
 
‘बापजन्म’ची प्रस्तुती मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २ यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट देणाऱ्या ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ची आहे.
 
निपुण धर्माधिकारी हे आज घराघरात पोहोचलेले नाव आहे. ‘मराठी कास्टिंग काऊच’ या अत्यंत नाविन्यपूर्ण आणि वेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून ते युवकांमध्येही लोकप्रिय झाले आहेत. आणि त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी २००९ मध्ये ‘नाटक कंपनी’ या संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून शतकांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या संगीत नाटकांचे पुनर्रुजीवन केले. त्या माध्यमातून शेक्सपियरच्या परंपरेलाही उजाळा दिला गेला. या नाटकांची मराठी रंगभूमीवर तर वाहवा झालीच पण त्याचबरोबर अमेरिकेतील आणि अगदी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवातही त्यांना मानाचे स्थान मिळाले.
 
भविष्याचा वेध घेणारा दिग्दर्शक म्हणून निपुण यांची ख्याती आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये कलाकार आणि लेखक म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. त्यांत ‘नौटंकी साला’ (२०१३) आणि ‘हरीश्चंद्राची फॅक्टरी’ (२००९) यांचा समावेश आहे.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT