nipun dharmadhikari shared post about purushottam karandak result he arrange the workshop for all participants  
मनोरंजन

गप्पं राहून चालणार नाही! 'पुरुषोत्तम'च्या निकालावर निपुण धर्माधिकारी..

'पुरुषोत्तम करंडक' स्पर्धेमध्ये यंदा कोणत्याही संघाला करंडक न दिल्याने राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

नीलेश अडसूळ

Purushottam Karandak : पुण्यातीलच नव्हे तर अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेली अत्यंत बहुमानाची आणि बहू प्रतिष्ठित समजली जाणारी 'पुरुषोत्तम करंडक' (Purushottam Karandak) ही एकांकिका स्पर्धा सध्या चर्चेत आहे. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक मोठी घटना घडली. एकही एकांकिका पात्र नाही असे कारण देऊन परीक्षकांनी यंदा करंडक कोणालाही दिला जाणार नाही अशी घोषणा केली. एकांकिका स्पर्धेमध्ये ही घटना पहिल्यांदाच घडली असून, याचा मोठ्या स्तरावर निषेध केला जात आहे. मराठीतील दिग्गज मनाला जाणारा तरुण दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यानेही आता पोस्ट लिहीत आपले मत व्यक्त केले आहे. (nipun dharmadhikari shared post about purushottam karandak result he arrange the workshop for all participants )

परीक्षकांच्या मते, करंडक देण्याच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय आढळून आलेला नाही. त्यामुळे परीक्षकांनी केवळ सांघिक पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे koकोणत्याही महाविद्यालयाल हा करंडक मिळू शकलेला नाही. ज्या स्पर्धेसाठी मुलं वर्षभर जीवाचं रान करतात त्यांच्या पदरी असा निकाल यावा ही दुर्दैवी बाब असल्याने आता विविध स्तरातून या स्पर्धेचा आणि परीक्षकांच्या निर्णयाचा निषेध केला जात आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हंटले आहे. त्यामध्ये निपुण धर्माधिकारी याचीही पोस्ट अत्यंत महत्वाची ठरते.

निपुण म्हणतो, 'पुरुषोत्तम करंडकामुळे मला नाटकाची आवड निर्माण झाली. या स्पर्धेने जे प्रोत्साहन दिलं ते आजही पुरून उरतं. त्याचा यावर्षी असा निकाल लागला याने फार वाईट वाटलं. हे चूक-बरोबर हा वाद घालून आता काही साध्य होणार नाही, पण नुसतं गप्पं राहून पण चालणार नाही.'

'पुरुषोत्तम २०२२ मध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी मी एक नाट्य कार्यशाळा घ्यायचं ठरवलं आहे. ऑक्टोबरमध्ये असेल. याचे तपशील देईनच, पण ही कार्यशाळा मोफत असेल.' अशी पोस्ट त्याने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Sheikh:''माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा, त्यामुळे...'' सहर शेख यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात काय खुलासा केला?

Local Body Election Maharashtra : ब्रेकिंग न्यूज! राज्यात जिल्हा परिषदेत भाजपने खाते उघडले, दोन उमेदवार बिनविरोध

फिरायला जायचं म्हणत OYO मध्ये नेलं, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीला गळा चिरून संपवलं; कारण आलं समोर...

Latest Marathi news Live Update: सांगलीतील नर्सरीला लागलेल्या आगीत महिलेचा संशयास्पद मृत्यू

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील डे-नाईट कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, तर वनडे-टी२० संघातही मोठा बदल

SCROLL FOR NEXT