Anant Radhika Pre Wedding Nita Ambani Dance
Anant Radhika Pre Wedding Nita Ambani Dance esakal
मनोरंजन

Nita Ambani Dance : दीपिका, करिना अन् कतरिनाही नीता अंबानींपुढे फिक्या! अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमधील 'त्या' डान्सचं होतयं कौतुक

युगंधर ताजणे

Nita Ambani Viral Video : अनंत अंबानी आणि राधिकाच्या प्री वेडिंगनं साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्या प्री वेडिंगला हजेरी लावलेल्या पाहुण्यांविषयी, त्या सोहळ्यातील कार्यक्रमांविषयी, आणि सेलिब्रेटींच्या रंगलेल्या परफॉर्मन्सनं चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पडलं आहे. या सगळ्यात चर्चा होत आहे ती नीता अंबानी यांच्या डान्सची.

साऱ्या बॉलीवूडनं जामनगरमध्ये हजेरी लावत दिलेल्या परफॉर्मन्सचं कौतुक होत असताना नीता अंबानी यांच्या डान्सनं उपस्थितांची दाद मिळवली आहे. बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा सरस असा परफॉर्मन्स त्यांनी दिल्याचे बोलले जात आहे.

बॉलीवूडच्या अभिनेत्रींपेक्षा सरस नीता अंबानींचा डान्स...

अनंत अन् राधिकाच्या त्या प्री वेडिंगमध्ये सारा अली खान, सुहाना खान, अनन्या पांडे, दीपिका पदुकोण, करिना कपूर आणि आलिया भट्ट यांनी यावेळी डान्स केल्याचे दिसून आले. मात्र यासगळयात चर्चा रंगली ती नीता अंबानी यांच्या परफॉर्मन्सची. त्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी अनंत अंबानीसाठी अंबा मातेला प्रार्थना केली आहे.

मुलांसाठी देवीला केली प्रार्थना..

नीता अंबानी या नृत्याच्या माध्यमातून आपली मुलं आणि सुना यांच्यासाठी देवी अंबामातेला प्रार्थना केली आहे. तसेच त्यांनी आपला हा डान्स नातु शक्ती, वेदा आणि आदित्य यांना डिलिकेट केला आहे. नीता यांच्या या परफॉर्मन्सची जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना जिंकून घेतले आहे. नेटकऱ्यांनी नीता अंबानी यांच्या त्या डान्सवर दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

सेलिब्रेटींनी रंगली मैफल...

अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगला बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी हजेरी लावल्याचे दिसून आहे. नुसतीच उपस्थिती नाही तर त्यामध्ये परफॉर्मस देत त्यांनी उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले. यामध्ये सलमान खान, आमिर खान आणि शाहरुखच्या परफॉर्मन्सचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.

अनिल कपूर, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या रॉय, जान्हवी कपूर, अनन्या पांडे सह क्रिकेट जगतातील सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंग धोनी, हे देखील उपस्थित होते. दुसरीकडे मेटाचे चेअरमन मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका देखील या सोहळ्याला उपस्थित होती.

यापूर्वी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या डान्सनं देखील उपस्थित पाहुणे मंडळींना दाद देण्यास भाग पाडले होते. मुकेश अंबानी यांनी तर डॉन या चित्रपटातील गाण्यावर सादर केलेला वेगळा अंदाज बॉलीवूडमधील सेलिब्रेटींच्या कौतुकाचा विषय असल्याचे दिसून आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून जामनगरमधील या सोहळ्याची सोशल मीडियाची जोरदार चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT