Nitin Chandrakant Desai Death Raigad Police esakal
मनोरंजन

Nitin Desai Update: ND स्टुडिओवर जप्तीची होती टांगती तलवार! जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण होते प्रलंबित

बॉलीवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीनं बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे.

मनोज कळमकर

Nitin Chandrakant Desai Death Raigad Police : बॉलीवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीनं बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे.याशिवाय मराठी कलाविश्वामध्ये देखील खळबळ उडाली आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय असावे याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

देसाई यांनी त्यांच्या कर्जत- चौकफाटा येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. आज सकाळी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप उघड झालेले नाही; मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांच्या एनडी स्टुडियोवर जप्तीची टांगती तलवार होती. अशी शक्यता वर्तवली जाक आहे. मुंबईतील एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने मालमत्ता जप्त करण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. हे प्रकरण रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन महिने प्रलंबित होते.

कर्जत-चौकफाटा येथे नितीन देसाई यांच्या मालकीचे एनडी स्टुडिओ आहे. याच ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना आज सकाळी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकताना ND स्टुडीओ मध्ये मिळुन आला आहे. या घटनेत आम्ही सर्व बाबी तपासुन पाहत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाम बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू; बोटीत असलेल्या 32 भारतीयांची नावं आली समोर

Pune News: कर्तव्य बजावणाऱ्या PSI ला दिलासा; पुण्यातील डेक्कन हॉटेल कारवाईप्रकरणी संदीप कदम यांचे निलंबन मागे

Karad Crime: कऱ्हाड शहर पोलिसांची दमदार कामगिरी! पिस्टल विक्रीस आलेल्या चौघांना अटक; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे जप्त

MPSC Protest: विद्यार्थ्यांसोबत आजीही मैदानात! एमपीएससी आणि पोलिस भरतीसाठी संगमनेरमध्ये अनोखे आंदोलन, प्रांत कार्यालयासमोर ठिय्या

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

SCROLL FOR NEXT