Nitin Chandrakant Desai Death ND Studio  esakal
मनोरंजन

Nitin Chandrakant Desai Funeral : ना सलमान, ना अक्षय, ना किंग खान! अंत्ययात्रेला 'मराठी सेलिब्रेटींची' हजेरी

काही नेटकऱ्यांनी मराठी सेलिब्रेटींना धन्यवाद देत बॉलीवूड कलाकारांवर आगपाखड केली आहे.

युगंधर ताजणे

Nitin Chandrakant Desai Funeral : बॉलीवूडचे ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येनं मोठी खळबळ उडाली आहे. ज्या कलाकारानं तीन दशकांहून अधिक काळ प्रदीर्घ संघर्ष करत आपली वेगळी ओळख निर्माण केली त्या देसाई यांची आत्महत्या अनेकांसाठी धक्कादायक बाब म्हणावी लागेल. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये अखेरचा श्वास घेतला.

देसाई यांच्या सारख्या प्रतिभावान कलाकारानं असं टोकाचं पाऊल का उचललं यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आज देसाई यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यात मराठी सेलिब्रेटींचा मोठा सहभाग होता. नावांचा उल्लेख करायचा झाल्यास सुबोध भावे, मानसी नाईक, सोनाली कुलकर्णी, अभिजित केळकर, माधव देवचक्के आणि रवी जाधव या मान्यवरांनी हजेरी लावली होती.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

बॉलीवूडमधील मोठमोठे सेलिब्रेटी अंत्ययात्रेला हजर राहतील अशी चर्चा होती. मात्र तसे झाले नाही. आमिर खान वगळता बाकी कुणी दिसले नाही. आमिरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बॉलीवूडचे बाकीचे सेलिब्रेटी न दिसल्यानं नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. नितीन देसाई यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराच्या अंत्ययात्रेच्या वेळी बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी हजर राहणे गरजेचे होते. मात्र चित्र निराशाजनक असल्याचे दिसून आले.

काही नेटकऱ्यांनी मराठी सेलिब्रेटींना धन्यवाद देत बॉलीवूड कलाकारांवर आगपाखड केली आहे. देसाई यांनी बॉलीवूडमधील सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांच्या चित्रपटासाठी कला दिग्दर्शन केले होते. त्यात अनिल कपूर यांच्यापासून आमिर खानपर्यत अशा अनेक कलाकारांची नावं घेता येतील. बॉलीवूडमधील जेवढे ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट झालेले चित्रपट आहेत त्यातील बहुतांशी चित्रपटाचे कलादिग्दर्शन देसाई यांचे होते.

१९४२ अ लव स्टोरी या चित्रपटापासून देसाई यांच्या चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली होती. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले होते. त्यात हम दिल दे चुके सनम, देवदास, इश्क, लगान, हरिश्चंद्राची फॅक्टरी, जोधा अकबर, अजिंठा, फर्जंद, परिंदा,राजू चाचा, द लिजंड ऑफ भगतसिंग, अकेले हम अकेले तुम, मिशन कश्मिर, रंगीला यासारख्या अनेक चित्रपटांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: KL Rahul ने शतकानंतर का वाजवली शिट्टी? या नव्या सेलिब्रेशनमागचं नेमकं कारण काय?

Video : राजेशच राकेश असल्याचं सत्य ईश्वरीसमोर उघड ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता तरी तिला अक्कल येऊ दे"

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Dmart Offers : दसरा स्पेशल! डीमार्टमध्ये 'या' वस्तू मिळतायत जास्त स्वस्त, पुढचे 4 दिवस डिस्काउंट ऑफर, पाहा एका क्लिकवर..

OBC Scholarship Schemes : १०वी, १२वीच्या ओबीसी विद्यार्थ्यांना मिळते शासनाची शिष्यवृत्ती, सरकारच्या 'या' ८ योजना जाणून घ्या....

SCROLL FOR NEXT