nitin chandrakant desai funeral aamir khan comment on bollywood actor  SAKAL
मनोरंजन

Nitin Desai: नितीन देसाईच्या अंत्यसंस्काराला बॉलीवूड तारके का आले नाहीत ? आमिर खानने स्पष्ट सांगितलं

नितीन देसाईंच्या अंत्यसंस्काराला बॉलीवुड सेलिब्रिटी का आले नाहीत, असा सवाल आमिर खानला विचारण्यात आला

Devendra Jadhav

Nitin Desai News: नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. आज शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. N D Studio त नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्काराला मराठी कलाकारांनी हजेरी लावली. पण बॉलीवुड कलाकारांची मात्र गैरहजेरी दिसली.

नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्काराल आमिर खान उपस्थित होता. नितीन देसाईंनी ज्या हिंदी सिनेमांसाठी भलेमोठे सेट्स उभारले, असे बॉलीवुड सेलिब्रिटी का आले नाहीत, असा सवाल आमिर खानला विचारण्यात आला. तेव्हा आमिर खान काय म्हणाला पाहूया.

(nitin chandrakant desai funeral aamir khan comment on bollywood actor)

बॉलीवूड तारके का आले नाहीत? आमिर खान म्हणाला...

आमिर खान नितीन देसाईंच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता. तो म्हणाला.. "जो जिता ओ सिकंदर पासून मी सोबत काम करतोय. म्हणून मला वैयक्तिक खूप दुःख झालंय. खूपच दुःखद बातमी आहे.. असं घडलंय मला खरं वाटत नाही."

आमिर खान पुढे म्हणाला.. "मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. नितीनजी नी खूप कमालच काम केलंय.. खूप बुद्धिवान आणि क्रिएटिव्हिटी असलेला माणूस होता. बॉलीवूड मधी सिनेतारके आले नाहीत ते बिझी असल्यामुळे आले नसतील."

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ECL finanace कंपनीच्या एडेलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्जाच्या परतफेडीसाठी सातत्यानं तगादा लावत मानसिक त्रास दिला. असे त्या तक्रारीत म्हटले गेले आहे. त्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

नितीन देसाईंची आत्महत्या

नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये काल आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलीवूडविश्वात मोठी खळबळ उडाली होती. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या कलाकृतींनीं त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. त्यात त्यांचे जाणे हे अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारे होते. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara: 'क्रिकेटसाठी तू बरीच तडजोड केलीस, आता...' पुजारासाठी पत्नी पूजाची भावनिक पोस्ट

'वडापाव'मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी; ठरणार प्रसाद ओकचा १०० वा चित्रपट

Video: असं कुठं होतं का राव! US Open स्पर्धेत टेनिसपटूचा राडा, फोटोग्राफरचा व्यत्यय अन् भिडला अम्पायरला; प्रेक्षकांनी दिली साथ

Hartalika Vrat 2025 Marathi Wishes: शिव व्हावे प्रसन्न...! हरतालिकेच्या प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा, वाचा हटके संदेश

Nashik Crime : एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट; सिडकोतील अल्पवयीन विद्यार्थिनीने संपवलं जीवन, दोघे संशयित अटकेत

SCROLL FOR NEXT