Nitin Desai Death Esakal
मनोरंजन

Nitin Desai Death: नितीन देसाई यांचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमार्टमचा अहवाल आला समोर

नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनानं बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली

अंकिता खाणे (Ankita Khane)

Nitin Chandrakant Desai Death : नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनानं बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी त्यांच्या स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींना उधाण आले आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी नितीन देसाई यांचा मृतदेह काल ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयात पाठवला होता. तिथे ४ डॉक्टरांच्या पथकांने त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले आहे. नितीन देसाई यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

नितीन देसाई यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला, अशी प्राथामिक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर नितीन देसाई यांचं पार्थिव पुन्हा ND स्टुडिओत नेलं जाणार असून तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.

काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अडचणी वाढल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी नितीन देसाई यांचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. मोबाईलमधील काही ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. पोलीस याबाबतचा आधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT