Nivedita Saraf shared post about zee marathi gave life time achievement award to veteran actor ashok saraf
Nivedita Saraf shared post about zee marathi gave life time achievement award to veteran actor ashok saraf sakal
मनोरंजन

Nivedita Saraf: अशोकला जीवनगौरव पुरस्कार देताना.. निवेदिता सराफ यांची भावूक पोस्ट..

नीलेश अडसूळ

Nivedita Saraf shared post for ashok saraf: मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत मानाचा समजला जाणारा 'झी चित्र गौरव' पुरस्कार सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. या दीमाखदार सोहळ्याचे आज रविवार २६ मार्च रोजी प्रक्षेपण झी मराठी वाहिनीवर होणार आहे.

अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स असल्याने हा सोहळा अविस्मरणीय झालाच पण या सोहळ्यातील एक खास बात म्हणजे यंदा अभिनय सम्राट 'अशोक सराफ' या महान नटसम्राटाला 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा जीवन प्रवास उलगडत अनोखी मानवंदना दिली. तर अशोक मामांना पुरस्कार देण्यासाठी अनेक अभिनेते मंचावर आले. हा सोहळा पाहण्यासारखा झाला.

यावेळी मामांचे कौतुक, सन्मान पाहून सारेच भारावले. अगदी अशोक सराफ यांच्याही डोळ्यात पाणी आले. या सोहळ्या नंतर अशोक मामांच्या पत्नी आणि निवेदिता सराफ यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

(Nivedita Saraf shared post about zee marathi gave life time achievement award to veteran actor ashok saraf)

नुकतंच निवेदिता सराफ यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अभिनेता सिद्धार्थ जाधव, रितेश देशमुख, आदिनाथ कोठारे, महेश कोठारे, सुबोध भावे, अंकुश चौधरी, उमेश कामत, श्रेयस तळपदे, भरत जाधव  ही कलाकार मंडळी बसून अशोक सराफ यांना हा पुरस्कार देताना दिसत आहेत.

या सोहळ्या वेळी सुबोध भावे याने अशोक मामांचे भरभरून कौतुक केले. केवळ मराठी सिनेमाच नाही तर मराठी मनोरंजन विश्व म्हणजेच अशोकमामा अशी त्यांना उपमा दिली. मराठी मनोरंजन विश्व समृद्ध करण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा असून त्यांच्या सोबत काम करणं तर दुर फक्त त्यांना एक क्षण भेटण्यासाठी आम्ही आसुसलेले असतो असं सुबोध म्हणाला. हा सोहळा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासाठीही अविस्मरणीय होता.

म्हणूनच निवेदिता सराफ यांनी पोस्ट करून लिहिलं आहे की, 'मी झी मराठीची खूप ऋणी आहे अशोकला जीवनगौरव पुरस्कार देताना इतका अविस्मरणीय सोहळा केल्याबद्दल.. '

निवेदिता सराफ यांच्या पोस्ट वर अनेकांनी कमेंट करत अशोक सराफ यांच्या विषयी भरभरून लिहिले आहे.

अशोक सराफ यांची चित्रपटसृष्टीतली ओळख म्हणजे ‘अशोक मामा’! खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे अशोक मामा. पन्नासच्या वर हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक.

एवढा प्रचंड प्रवास आहे मामांचा. जो आजही तेवढ्याच ताकदीने चालू आहे. अभिनय शिकायला कुठल्या शाळेत जायची गरज नाही. अशोक सराफ नावाचं विद्यापीठ आहे त्यांच्याकडे केवळ बघत राहिलो तरी खूप काही शिकण्यासारखं आहे, अशा शब्दात यावेळी मामांना मानवंदना दिली गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT