niyam va ati lagu new marathi drama of prashant damle sankarshan karhade directred by chandrakant kulkarni
niyam va ati lagu new marathi drama of prashant damle sankarshan karhade directred by chandrakant kulkarni sakal
मनोरंजन

प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे पुन्हा गाजवणार! येतंय ‘नियम व अटी लागू'..

नीलेश अडसूळ

niyam va ati lagu prashant damle: माणूस हा असा प्राणी आहे की, सामान्यपणे तो कोणत्याही मानवी नियमांत बसत नाही. कालचा माणूस आज वेगळा भासतो. कोणत्या प्रसंगी आपण कसे वागू हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे सांगणे आणि स्वतः वागणे यात फरक पडतो. थोडक्यात काय तर नियम व अटींच्या बाबतीत विचाराच्या, वागण्याच्या बाबतीत ठामच असावे, असा हट्ट अनेकदा चुकीचा ठरतो.

(niyam va ati lagu new marathi drama of prashant damle sankarshan karhade directred by chandrakant kulkarni)

सोयीनुसार नियमातून पळवाट काढताना अटींचा भंग होऊ शकतो. हे माहीत असूनही नियम व अटी लागू केल्या जातात. त्यात जर या नियम व अटी नवरा व बायकोच्या नात्याला लागू करायच्या असतील तर काय? हाच भन्नाट विषय घेऊन प्रश्नात दामले निर्मित ‘नियम व अटी लागू’ हे आजच्या पिढीचं खुसखुशीत नाटक रंगभूमीवर येत आहे.

गौरी थिएटर निर्मित व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नव्या नाटकाचा शुभारंभ शनिवार १८ मार्च सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली रात्रौ ८.३० वा. होणार आहे.

नाटकातील नियम व अटींच्या बाबतीत सदैव जागरूक असणारे निर्माते प्रशांत दामले, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि आपल्या खुमासदार लेखणीने नियम व अटींचा लेखाजोगा मांडणारे युवा लेखक संकर्षण कऱ्हाडे या त्रयीचं हे नाटक आहे. स्वत: संकर्षण कऱ्हाडे अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद बर्वे यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT