Elvish Yadav esakal
मनोरंजन

Elvish Yadav: बिग बॉस फेम एल्विश यादवला अटक; आज कोर्टात केलं जाणार हजर

बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादवला (Elvish Yadav) नोएडा पोलिसांनी अटक केली आहे.

priyanka kulkarni

Elvish Yadav: युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी 2 या कार्यक्रमाचा (Bigg Boss OTT 2) विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती डीसीपी नोएडा विद्या सागर मिश्रा यांनी ANI ला दिली आहे.

गेल्या वर्षी रेव्ह पार्ट्यांमध्ये सापांच्या विषाचा नशेसाठी वापर केल्याच्या प्रकरणात एल्विशचं नाव समोर आलं होतं. याच प्रकरणी एल्विशला अटक करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. पण एल्विशच्या अटकेमागील नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

एल्विश यादव हा नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो यूट्यूबर मॅक्सटर्न (Maxtern) उर्फ ​​सागर ठाकूरला मारहाण केल्या प्रकरणी चर्चेत होता. तसेच गेल्या वर्षी रेव्ह पार्टी प्रकरणामुळे तो अडचणीत आला होता. गेल्यावर्षी 8 नोव्हेंबर रोजी नोएडा पोलिसांनी एका रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणात युट्युबर एल्विश यादवचंही नाव समोर आलं.या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. यामध्ये राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ यांचा समावेश आहे.

एल्विशने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं होतं. एल्विशने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला होता ,"माझ्याबद्दल जे काही बोलले जात आहे ते खरं नाहीये. आरोप करून माझे नाव खराब करू नका. मी यूपी पोलिस आणि माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करू इच्छितो की या प्रकरणात माझ्यावरील आरोपांपैकी 1 टक्का देखील सिद्ध झाले तर त्याची जबाबदारी मी घेण्यास तयार आहे."

एल्विशचा चाहता वर्ग मोठा आहे. बिग बॉस ओटीटी 2 या कार्यक्रमामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. एल्विशचे राव साहब रोलिन हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT