Model Dies During Ramp Walk Esakal
मनोरंजन

Model Dies During Ramp Walk: फॅशन शोदरम्यान मोठा अपघात! मॉडेलचा जागीच मृत्यू

Vaishali Patil

Model Dies During Ramp Walk: मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून अनेक दुख:द घटना घडत आहेत. आता एक भयानक घटना नोएडामधुन समोर आली आहे. एका फॅशन शोदरम्यान रविवारी मोठी दुर्घटना घडली. रॅम्पवर चालत असतांना मॉडेलवर लाइटिंगचा खांब पडल्याने २४ वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दुसरा तरुण जखमी झाला आहे.

ही घटना नोएडातील फिल्मसिटी परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहिती नुसार मृत मॉडेलचं नाव वंशिका चोप्रा आहे. अपाघातानंतर तिला कैलाश हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. वृषिका ही नोएडा एक्सटेन्शनचा भाग असलेल्या गौर सिटी-2 मध्ये वास्तव्यास होती. तर जखमी तरुणाचे नाव बॉबी राज आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कार्यक्रमाचे आयोजक आणि लाइटिंग ट्रस बसवणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात पोलिसांनी या घटनेची माहिती तरुणीच्या नातेवाईकांना आणि तरुणाला दिली आहे.

नोएडाचे अतिरिक्त उपायुक्त पोलिस (ADCP) शक्ती अवस्थी यांनी सांगितले की, “फिल्म सिटीच्या स्टुडिओमध्ये फॅशन शोदरम्यान वंशिका चोप्राचा ट्रस घसरल्याने मृत्यू झाला. मृतदेहाचा पंचनामा पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT